अजित पवार यांच्या अवमानावर सोशल मिडियात टिकेचा भडिमार 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सात ऑक्टोबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीनहरित वास्तूचे उद्‌घाटन झाले. महसूल व वन विभागाने त्यासाठी छापलेल्या निमंत्रणपत्रिकेत माजी उपमुख्यमंत्री व विधानसभेतील राष्ट्रवादीचे गटनेते पवारांचे नाव हे "प्रोटोकॉल'नुसार प्रसिद्ध केले नव्हते. त्यामुळे ते या सोहळ्याला आले नसल्याची चर्चा होती. राष्ट्रवादीने त्याच दिवशी या अवमानाचा निषेध केला. मात्र,त्याची दखल घेतली गेली नाही. योग्य उत्तर प्रशासनाकडून नाही.
अजित पवार यांच्या अवमानावर सोशल मिडियात टिकेचा भडिमार 

पिंपरी : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या पर्यावरणपूरक इमारतीच्या उद्‌घाटनाच्या निमंत्रणपत्रिकेचा वाद तीन दिवसानंतर आता सोशल मिडीयावर उफाळून आला आहे. त्यात शासन व प्रशासन अशा दोघांवरही टीकेची झोड उठविण्यात आली आहे 

या इमारतीचे भूमीपूजन राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 2014 मध्ये झाले होते. तसेच त्यांनी ती पूर्ण करण्यासाठी मोठा पाठपुरावाही केला होता. असे असूनही तिच्या उद्‌घाटनाच्या वेळी पवार यांचे नाव निमंत्रणपत्रिकेत एकदम खाली पहिल्यांदाच निवडून आलेल्या पुण्यातील भाजप आमदारानंतर टाकण्यात आले होते. त्यामुळे शासन व प्रशासनाकडून पाळण्यात न आलेल्या या "प्रोटोकॉल'चा समाचार सोशल मिडीयावर सध्या गाजतो आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सात ऑक्‍टोबरला या हरित वास्तूचे उद्‌घाटन झाले. महसूल व वन विभागाने त्यासाठी छापलेल्या निमंत्रणपत्रिकेत माजी उपमुख्यमंत्री व विधानसभेतील राष्ट्रवादीचे गटनेते पवारांचे नाव हे "प्रोटोकॉल'नुसार प्रसिद्ध केले नव्हते. त्यामुळे ते या सोहळ्याला आले नसल्याची चर्चा होती. राष्ट्रवादीने त्याच दिवशी या अवमानाचा निषेध केला. मात्र,त्याची दखल घेतली गेली नाही. योग्य उत्तर प्रशासनाकडून नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी हा विषय सोशल मिडीयावर काल मांडला आणि राष्ट्रवादीचे फॉलोअर नेटीझन्स त्यावर तुटून पडले. अत्यंत तिखट प्रतिक्रिया त्यांनी नोंदविल्या. त्यामुळे कालपासून हा मुद्दा सोशल मिडियावर चर्चेत आला आहे. 

यासंदर्भात वाघेरे-पाटील म्हणाले, ""अजितदादांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे केवळ भूमिपूजन केलेच नाही, तर ती पर्यावरणपूरक व हरित व राज्यात एकमेव आदर्श व्हावी म्हणून मोठा पाठपुरावाही केला. सध्याही ते विधिमंडळात ज्येष्ठ सदस्य आहेत. माजी उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे प्रोटोकॉलनुसार त्यांचे नाव पत्रिकेत वर येणे अपेक्षित होते. मात्र, भाजपने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण याबाबत केले आहे. साहजिकच त्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. 

स्वतः अजित पवार यांनी याबाबत काही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ते या इमारतीच्या उद्‌घाटन समारंभाआधी एक दिवस या नवीन कार्यालयात गेले आणि त्यांनी त्याच पाहणी केली. तसेच आवश्‍यक त्या सूचना देखील केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांनी या कार्यालयाचे भूमिपूजन केले, त्यांचाही नामफलक लावा, अशी सूचना प्रशासनाला केली आहे. या सूचनेची दखल घेतली जाणार का, याची आता उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com