Ajit Pawar's Marathon Pimpri Tour | Sarkarnama

नऊ तासांत पन्नास गणेश मंडळांना भेटी : अजितदादांचा नॉन-स्टॉप दौरा पिंपरी दौरा

उत्तम कुटे
रविवार, 23 सप्टेंबर 2018

काल दुपारी साडेतीन वाजता अजितदादांच्या दौऱ्यास दापोडीतून झाली. रात्री सव्वाबारा वाजता तो पिंपरीत संपला. तरीही त्यांच्यातील ऊर्जा व उत्साह कायम असल्याचे दिसून आले. आपल्याच पक्षाच्या मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. आरती केल्यानंतर पिंपळे सौदागर येथे केलेल्या भाषणात त्यांनी निवडणुक तयारीला जोमाने लागा, असे तेथील इच्छुक व कार्यकर्त्यांना सांगितले. 

पिंपरी : गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काल पिंपरी-चिंचवडचा नऊ तास मॅरेथॉन, नॉन-स्टॉप दौरा केला. त्यात त्यांनी नियोजनापेक्षा दुप्पट म्हणजे पन्नास गणेश मंडळांना भेटी देऊन तेथे आरती केली. अशा कामासाठी एवढा वेळ एका शहरात देणारे ते पहिले नेते आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चार्ज झाल्याचे दिसून आले. महागाई कमी करण्याची सुबुद्धी या सरकारला दे, असे साकडे अजितदादांनी यावेळी गणरायाला घातले.

काल दुपारी साडेतीन वाजता अजितदादांच्या दौऱ्यास दापोडीतून झाली. रात्री सव्वाबारा वाजता तो पिंपरीत संपला. तरीही त्यांच्यातील ऊर्जा व उत्साह कायम असल्याचे दिसून आले. आपल्याच पक्षाच्या मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. आरती केल्यानंतर पिंपळे सौदागर येथे केलेल्या भाषणात त्यांनी निवडणुक तयारीला जोमाने लागा, असे तेथील इच्छुक व कार्यकर्त्यांना सांगितले. 

नाकर्ते भाजप सत्तेवर आल्य़ाने कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना समाधानी ठेव, राज्य आपोआप सुखी होईल, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी गणरायाकडे केली. समोरापापूर्वी वाकड येथील पक्षाचे शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या घरी दादांनी रात्रीचे जेवण केले. रात्री सव्वा वाजता ते शहरातून मुंबईला रवाना झाले.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, प्रवक्ते फजल शेख, पालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने, ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्यासह स्थानिक नगरसेवक दौऱ्यात सामील झाले होते. 

संबंधित लेख