Ajit Pawar vs Vinod Tawde | Sarkarnama

विनोदाच्या तावडीतून शिक्षणाची सुटका करा - अजित पवार

ब्रह्मा चट्टे : सरकारनामा न्यूज ब्यूरो
शुक्रवार, 9 मार्च 2018

सुरवातीपासून विनोद तावडे नाराज होते. त्यांना शिक्षण विभाग नकोच होता. त्यांना गृहमंत्री व्हायचं होतं. पण त्यांना दिला नाही. त्यामुळे ते त्या विभागावर अन्याय करत आहेत. त्यामुळे विनोदाच्या तावडीतून शिक्षणाची सुटका करा.

- अजित पवार

मुंबई : " सुरवातीपासून विनोद तावडे नाराज होते. त्यांना शिक्षण विभाग नकोच होता. त्यांना गृहमंत्री व्हायचं होतं. पण त्यांना दिला नाही. त्यामुळे ते त्या विभागावर अन्याय करत आहेत. त्यामुळे विनोदाच्या तावडीतून शिक्षणाची सुटका करा ,"असा टोला लगावत राष्ट्रवादी पक्षाचे विधीमंडळाचे गटनेते अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. 

शिक्षणाच्या गंभीर प्रश्नांवर विरोधकांच्या वतीने नियम 293 अन्वये दाखल प्रस्तावावर आमदार अजित पवार विधानसभेत बोलत होते. अजित पवार म्हणाले, " राज्य सरकारने 1346 शाळा बंद करण्याचा संतापजनक निर्णय घेतला आहे. गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठीच सरकार काम करतय का काय असं वाटतयं. राज्य सरकारने शिक्षण द्यायला हवयं. पण सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी शाळा बंद करायला नको. आपली भाषा मराठी भाषा आहे. इंग्रजी शाळेचे फँड आलं आहे. त्यामुळे सरकारने मराठी शाळा बंद करायला नको. राज्यातील शिक्षकांची भरती बंद आहे. मुख्यध्यपाकांची नेमणूक होत नाही. महाविद्यालयात प्राचार्यांच्या नेमणका होत नसल्याचेही अजित पवार यांनी निदर्शनात आणून दिले. 

अजित पवार पुढे म्हणाले, " पुणे जिल्हा परिषदेने दप्तराचे ओझं कमी करण्याचा जो निर्णय घेतला त्याची माहिती मागवा. तो योग्य असेत तर तो राज्यात राबवा. आम्ही सगळ्यात जास्त निधी शिक्षण विभागाला आम्ही द्यायचो . पण आता राज्यातील वेतनावर 35 टक्के निवत्त वेतनावर 10 टक्के कर्जावरिल व्याजावर 12 टक्के खर्च होतो. त्यामुळे उरलेले 42 टक्के विकास कामांना रहाते, तरीही आपले अर्थमंत्री म्हणतात आपली अर्थव्यवस्था जगात भारी , आता काय कपाळावर मारून घ्यायचं का ? " 

संबंधित लेख