अजितदादा केमिकल इंजिनिअर रुपालीला म्हणाले, तु खरच ग्रेट, मी आणि ताई दोघेही तुझ्या पाठीशी 

निफाड तालुक्यातील केमिकल इंजिनिअर झालेल्या रुपाली शिंदेला नौकरी मिळेना तिने हिम्मत केली आणिचक्कचहाचे दुकान सुरु केले रुपालीच्या चहाची चवसर्वाना आवडली . राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी रुपालीची भेट घेऊन तिचे कौतुक केले .
Ajit-Pawar-&-Chemical-eng
Ajit-Pawar-&-Chemical-eng

पिंपळगाव बसवंत :  इंजिनिअरच्या हाताची  चहाची चव चाखुन प्राचार्य म्हणतात, 'इंजिनिअरींग सोड, चहाचा स्टॉल सुरु कर!' ही व्यवसायिक जाहिरात देशभर चर्चेत आहे.  शेतकरी कुटुंबातील रुपाली शिंदे या केमीकल इंजिनिअरला नोकरी मिळेना.

 तिने तंदुर चहाचे दुकान टाकले. आज नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांना हे कळले. ते वाहनांचा ताफा वळवुन तिच्या दुकानावर गेले. चहाची चव चाखली. अन्‌ पाठींबा देत 'तु खरच ग्रेट!. मी अन्‌ ताई (सुप्रिया सुळे) दोघेही सदैव तुझ्या पाठीशी.' या कौतुकाने तिचे काळीज सुपाएव्हढे झाले. 

शिंगवे (ता. निफाड) येथील रुपाली शिंदे ही सामन्य शेतकरी घरातली मुलगी. घरी दिड एकर जमीन. त्यावर कुटुंबाचा निर्वाह तसा अवघडच. त्यामुळे तिने सिन्नरच्या विश्‍वेसरय्या महाविद्यालयातुन केमीकल इंजिनिअरची पदवी घेतली. नोकरीसाठी खुप धडपड केली. मात्र यश आले नाही. 

त्यावर माजी आमदार दिलीप बनकर यांनी त्यांना मदतीचा हात दिला. त्यांनी पिंपळगाव बसवंत येथे चहाचा स्टॉल सुरु केला. तंदुर चहा सुरु केला. त्यात त्या चागंल्याच तरबेज बनल्या. त्यामुळे त्यांच्या चहाची ख्याती गावभर झाली. आज अजितदादा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप बनकर यांच्या संस्थेला भेट दिली. यावेळी बनकर यांनी त्यांना रुपाली विषयी माहिती दिली. 

तेव्हा कार्यक्रमाला निघालेले अजित दादा वाहनांचा ताफा वळवुन रुपालीच्या स्टॉलवर गेले आणि म्हणाले , 'मी तुमचा तंदुर चहा पिणार आहे. मात्र पैसे घेणार असशील तरच.' त्यानंतर दहा पंधरा मिनीटे तिथे थांबले. रुपाली तंदुर चहा कशी करते हे न्याहाळतांना त्यांच्या चेहऱ्यावरचे आश्‍चर्याचे भाव लपले नाहीत. चहा घेतल्यावर त्यांनी तिच्या घऱ्ची माहिती घेतली. 

नोकरीचा प्रयत्न केला नाही का? काय अडचणी आल्या? अशा भरपुर गप्पा मारल्या. ' तू खरोखरच ग्रेट आहेस. धाडसी आहेस. ताईंला (खासदार सुप्रिया सुळे) तुझ्याबद्दल सांगतो. काहीही मदत लागली तर केव्हाही फोन कर. मी आणि ताई दोघेही सदैव तुझ्या पाठीशी आहोत.' असे सांगुन ते निघाले. तशी वाहने व पदाधिकारी, नेत्यांची गर्दीही पांगली.

हे सगळेच अचानक घडले होते. त्यामुळे या प्रोत्साहनाने रुपालीचे काळीज सुपाएव्हढे झाले. "आजचा दिवस कधीच विसरणार नाही. सगळे अगदी स्वप्नवत वाटतेय'',अशी प्रतिक्रिया  तिने 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली. 
.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com