अजित पवार भल्या सकाळी पालिकेत आले आणि त्याचीच चर्चा झाली! 

अजित पवार भल्या सकाळी पालिकेत आले आणि त्याचीच चर्चा झाली! 

पुणे :  पुणे महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्‌घाटनापूर्वीच शहराचे माजी पालकमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सकाळीच भेट देऊन पाहणी केली. त्यामुळे कार्यक्रम सोडून पवार यांच्या भेटीची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू होती.
 
महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या या विस्तारित इमारतीचे उद्‌घाटन आज दुपारी चार वाजता उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री शरद पवार यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपने रडीचा डाव खेळत विरोधी पक्षाला डावलण्याची एकही संधी सोडली नाही. एवढेच नव्हे, तर महापालिकेकडून शहरात लावण्यात आलेल्या फ्लेक्‍सवरही जाणीवपूर्वक पवार यांचे छायाचित्र टाकण्यात आले नाही. त्याचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही उमटले. एक इन्व्हेंट म्हणून भाजपने या कार्यक्रमाकडे भाजपच्या नेत्यांनी पाहिले आहे.
 
इमारतीचे काम अपूर्ण असताना उद्‌घाटनाची घाई भाजपकडून केली जात आहे. त्यामुळे शहरात हा चर्चेचा विषय झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर आज सकाळीच साडेआठच्या सुमारास अजित पवार यांनी महापालिकेच्या नव्या इमारतीस भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्यासह काही मोजके सहकारी त्यांच्या सोबत होते. पवार यांनी सर्व माहिती घेतल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिल्या जात असलेल्या दुय्यम वागणूकीबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. त्यामुळेच कार्यक्रमाच्या ठिकाणी ऐनवेळी पक्षाकडून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com