ajit pawar targets taware over criticism | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

चंद्रराव तावरे यांना पवारसाहेबांच्या नखाची तरी सर येईल का? : अजितदादांचा तिखट सवाल

कल्याण पाचंगणे
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

माळेगाव : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामासाठी येऊन तेथे पवार कुटुंबियांवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना अजित पवार यांनी आज धुतले. या कारखान्यावर पवार यांच्या विरोधातील मंडळींची सत्ता असल्याने त्यांनी आवर्जून भाजप मंत्र्यांना बोलविले होते. त्यात या मंत्र्यांनी थेट शरद पवारांवरच आरोप केल्याने अजितदादांनी त्याचा समाचार घेतला.

माळेगाव : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामासाठी येऊन तेथे पवार कुटुंबियांवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना अजित पवार यांनी आज धुतले. या कारखान्यावर पवार यांच्या विरोधातील मंडळींची सत्ता असल्याने त्यांनी आवर्जून भाजप मंत्र्यांना बोलविले होते. त्यात या मंत्र्यांनी थेट शरद पवारांवरच आरोप केल्याने अजितदादांनी त्याचा समाचार घेतला.

एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, की बारामती अॅग्रो, दौंड शुगर, सोमेश्वर आदी कारखान्यांनी वेळेत हंगाम सुरू करून 75 हजार ते 1 लाख टनापर्यंचे ऊसाचे गाळप केले आहे. चंद्रराव तावरेंचा माळेगाव मात्र अद्याप बंदच आहे. भाजपचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, पंकजा मुंडे, दानवे यांनी आपल्या कारखान्यातील शेतकऱ्यांना एफआरपीची रक्मकसुद्धा दिली नाही. परंतु हेच चंद्रराव (आण्णा) तावरे त्यांचे गुणगाण गावून पवारसाहेबांवर टीका करतात. राष्ट्रीय नेते राहूल गांधी, फारूक अबदुल्ला, चंद्राबाबू नायडूंसारखे नेते पवारसाहेबांचे मार्गदर्शन घेतात. त्यामुळे आण्णांना पवारसाहेबांच्या नकाची तरी सर येईल का?

शरद पवार व चंद्रराव तावरे हे एके काळी मित्र होते. त्यानंतर १९९८ पासून त्यांच्यात दुरावा झाला. त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूकही लढविली होती. माळेगाव कारखान्यावरील राष्ट्रवादीची सत्ता तावरे यांनी कारखान्याच्या गेल्या निवडणुकीत घालवली. त्याचाही राग अजित पवार यांना आहे. कारखान्याच्या कारभारावर त्यांनी टिकास्त्र सोडले.
 
मंत्री गिरीश बापट, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, आणि रावसाहेब दानवे यांचे मोदी लाटेमुळे फावले. अन्यथा माझ्यावर टीका करण्याची त्यांची काय औकात आहे,` असा सवाल त्यांनी केला. `उजनी, कोयना सारख्या धरणांची उंची माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकालात वाढविली. जलसंधारणाची अनेक कामे केली आणि पाणी व शेती विषयावर मी व पवारसाहेबांनी सरकारमध्ये असताना महत्वपूर्ण कामे मार्गी लावली. त्यामुळेच पंतप्रधान मोदीसाहेबांनी बारामतीत येऊन आमच्या कामाचे कौतुक केले होते. परंतु सरकारमधील टिकोजीरावांनी बारामतीत येऊन आमच्यावर टिकेची गरळ ओकली. आमच्या जर नादी लागल तर सोडणार नाही, हे लक्षात राहू द्या.``असा इशारा पवार यांनी दिला.

 

संबंधित लेख