माझ्यावर टीका करायची दानवे यांची औकात आहे का : अजित पवार यांचा आरोप

माझ्यावर टीका करायची दानवे यांची औकात आहे का : अजित पवार यांचा आरोप

माळेगाव : महागाई, बेरोजगारी, आरक्षण, शेतीमालाच्या प्रश्नांबरोबर राफेल विमान घोटाळ्यासह भ्रष्टाचाराच्या प्रकरणांपासून जनतेचे लक्ष वळावे, यासाठी भाजपचे टिकोजीराव नेते न्यायप्रविष्ठ सिंचन प्रकऱणात माझ्याबाबत उलटसुटल वक्तव्य करीत आहेत. लोकांमध्ये गैरसमज पसरवित आहेत, असा पलटवार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

`मंत्री गिरीश बापट, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, आणि रावसाहेब दानवे यांचे मोदी लाटेमुळे फावले. अन्यथा माझ्यावर टीका करण्याची त्यांची काय औकात आहे,` असा सवाल त्यांनी केला. 

मोरगाव (ता.बारामती) येथे आज खरेदी-विक्री संघाचे खते व औषध विक्री शाखेच्या उद्धाटनाच्या निमित्ताने आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते.  माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगाम कार्यक्रमात काल पुण्याची पालकमंत्री गिरिश बापट, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, चंद्रराव तावरे यांनी पवार कुटुंबियांवर टिकेची झोड उठविली होती. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अजित पवारांच्या दारावर पोलिस असून त्यांना कधीही अटक होऊ शकते, असा इशारा दिला होता.

तोच धागा पडकडत अजित पवार यांनी मोरगावच्या सभेत संबंधित मंत्र्यांच्या अकार्यक्षम कारभाराचा खरफूस समाचार घेतला. ते म्हणाले, ``उजनी, कोयना सारख्या धरणांची उंची माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकालात वाढविली. जलसंधारणाची अनेक कामे केली आणि पाणी व शेती विषयावर मी व पवारसाहेबांनी सरकारमध्ये असताना महत्वपूर्ण कामे मार्गी लावली. त्यामुळेच पंतप्रधान मोदीसाहेबांनी बारामतीत येऊन आमच्या कामाचे कौतुक केले होते. परंतु सरकारमधील टिकोजीरावांनी बारामतीत येऊन आमच्यावर टिकेची गरळ ओकली. आमच्या जर नादी लागल तर सोडणार नाही, हे लक्षात राहू द्या.``असा इशारा पवार यांनी दिला.

माझ्यावरील सिंचन गैरव्यवहाराचे आरोप हे आता न्यायप्रविष्ट आहेत. असे असताना दानवे हे उलटसुलट वक्तव्ये करत आहेत. लोकांमध्ये गैरसमज पसरवित आहेत. लोकांचे लक्ष विचलित होण्यासाठी त्यांचा हा डाव आहे, असे त्यांनी सांगितले. 

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना 59 मिनिटात एक कोटी कर्ज मिळणार हे भाजपचे लबाडाच्या घरचे आवातणे आहे, असे सांगून पवार म्हणाले, ``सध्या सहकार चळवळ मोडीत काढून मार्केट कमिट्यांचे खाजगीकरण कोण करते आहे. भाजपवाल्यांचे सरकार असून त्यांनी सध्या जे खाजगी कारखाने आहेत, त्या कारखान्यांचे पुर्वीप्रमाणे सहकारात रुपांतर करण्यासाठी परवानगी द्यावी. वास्तविक विलासराव देखमुख हे मुख्यमंत्री असताना अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यावेळी खासगी कारखान्यांना परवानगी दिली, याचा अर्थ आम्ही शेतकऱ्यांचे कारखाने बंद पाडले, असा होत नाही. कर्जात असलेला सोमेश्वर कारखाना बाहेर काढून येथील शेतकऱ्यांना माळेगावपेक्षा अधिकचे शंभर रुपये दर अधिकचा दिला. त्यामुळे माळेगावचे कौतुक काय कामाचे? 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com