ajit pawar targets bjp leaders | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

केबल खोदाईमुळे कालवा फुटला : अजित पवारांचा आरोप

उमेश घोंगडे
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

पुणे : खडकवासला कालवा फुटीचे खापर  सत्ताधारी घुशी, उंदीर आणि खेकड्यांवर फोडत आहेत. मात्र मोठमोठ्या कंपन्यांना कालव्याच्या भरावावर केबल खोदण्यास दिलेल्या परवानगीने कमकुवत होऊन कालवा फुटल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. 

मोठमोठ्या केबल कंपन्यांना सवलती दिल्याने कालव्याचा भराव खोदून केबल टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे कालवा कमकुवत झाला व त्याला भगदाड पडले. मात्र घुशी, उंदीर आणि खेकड्यांचे नाव घेत मोठ्या कंपन्यांना दडवून ठेवण्याचा उद्योग सत्ताधारी करीत आहेत, असा आरोप पवार यांनी केला.

खेकडा, घुशी आणि उंदरांमुळे कालवा फुटल्याचे जलसंधारण मंत्र गिरीश महाजन यांनी म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर बोलताना पवार यांनी कालवा पक्षाच्या आढावा बैठकीत बोलताना पवार यांनी राज्य व केंद्र सरकारवर टीका केली. सामान्यांसाठी पेट्रोल-डिझलची दरवाढ कमी करण्याची सरकारची तयारी नाही. मात्र मोठमोठे उद्योगपती बॅंकांचे हजारो कोटी रूपये बुडवून देशातून पळ काढताना सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. या सरकारला सामान्यांचे काहीच देणे-घेणे नाही. सरकार केवळ उद्योगपतींचे आणि धननांडग्यांचे सरकार आहे, असे पवार यांनी सांगितले.

कालवा फुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी पवार यांनी तातडीने भेट देऊन घटनेची माहिती घेत पूरग्रस्तांना दिलासा दिला होता. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी विशेषत: पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर जोरदार टीका केली होती. लोकांच्या संकटावेळी धाऊन जाण्यापेक्षा पालमंत्री बापट व सर्व भाजपावाल्यांना निवडणुका जिंकण्याचे पडले आहे, अशा कडक शब्दात पवार यांनी टीका केली होती.

संबंधित लेख