Ajit Pawar - Anil Bhaidas
Ajit Pawar - Anil Bhaidas

अजित पवारांनी घेतले अनिल भाईदासांना गाडीत 

जळगाव लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी अनेकांच्या नावाची चर्चा सुरू आहे. अमळनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल भाईदास पाटील यांच्या उमेदवारीही निश्‍चित असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनिल भाईदास यांना स्वत:हून आपल्या गाडीत बसवून घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी अनेकांच्या नावाची चर्चा सुरू आहे. अमळनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल भाईदास पाटील यांच्या उमेदवारीही निश्‍चित असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनिल भाईदास यांना स्वत:हून आपल्या गाडीत बसवून घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 
परिवर्तन निर्धार यात्रेच्या निमित्ताने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जळगावात आहेत. आज आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर पवार हे अॅड. रविंद्र पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने त्यांचे सात्वंन करण्यासाठी निवासस्थानी रवाना झाले. त्यावेळी अनिल भाईदास पाटील हे आपल्या वाहनातून निघालेले असतानाच अजित पवार यांनी त्यांना बोलावून आपल्या सोबत चलण्यास सांगितले, त्यावेळी अनिल भाईदास पवारांच्या गाडीत बसून रवाना झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदार संघातून इतर नावे चर्चेत असली तरी अनिल पाटील यांनाच उमेदवारी मिळणार काय? याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com