ajit pawar, supriya sule eat bhji in aurangabad hotel | Sarkarnama

अजितदाद, सुप्रियाताईनी मारला गरम गरम भजीवर ताव ! 

प्रकाश बनकर 
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी येथील एका हॉटेलात गरम गरम भजीवर ताव मारला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संविधान बचाव मेळाव्यासाठी आलेले पवार आणि सुळे यांनी मंगळवारी (ता.9) मेळाव्याच्या पुर्वी शहरातील मुख्य बाजारपेठेत नोटबंदी आणि जीएसटीचा व्यापारी आणि व्यवायिकांवर काय परिणाम झाला या विषयी संवाद साधला. 

सकाळी साडे दहानंतर पवार-सुळे यांच्यासह आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुख्य बाजारपेठ असलेल्या मछली खडक येथील उत्तम मिठाई भांडारात जाऊन भजी आणि फळांबरोबरच मिठाईचाही आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी हॉटेल चालकाशी जीएसटीमुळे व्यवसायावर परिणाम झाला का ? अशी विचारणा देखील केली. 

त्यानंतर शहरातील जुने बुक स्टॉल, फळ विक्रेते, सराफा बाजारात फेरफटका मारत या दोन्ही नेत्यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करत अडचणी जाणून घेतल्या.  
 
संबंधित लेख