ajit pawar snubs raj thakrey | Sarkarnama

राज ठाकरे हे बोलघेवडे : अजित पवार यांचा टोला

ज्ञानेश सावंत
रविवार, 12 ऑगस्ट 2018

पुणे : बोलघेवड्या लोकांना फार काही करायचे नसते. त्यांना काही दाखवयाचं नसतं. त्यांची एखादी सभा झाली की निघून जायचं असतं, अशी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज यांनी त्यांच्यावर केलेल्या टिकेला उत्तर दिले.

आमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी काही थेट प्रश्न विचारले होते. १९६० ते २०१८ या कालावधीत झालेला सिंचनाचा निधी कुठे मुरला? तो जर मुरला नसता तर महाराष्ट्राची पाण्याची पातळी खाली गेली नसती, अशी टीका राज यांनी केली.

राज हे भाषण करून निघून गेले. त्यानंतर अजित पवार हे भाषणाला उभे राहिले. त्यांच्या जिव्हारी राज यांची टीका लागलेली होतीच. त्यांनी थेट राज यांचे नाव घेतले नाही. मात्र बोलघेवड्या लोकांना फार काही करायचं नसतं, असं टोला अजित पवार यांनी लगवाला. 

महाराष्ट्राच्या पाणीप्रश्नाविषयी बोलताना अजित पवार यांनी पीक पॅटर्न बदलण्याची गरज असल्याचे नमूद केले. उसासारखी पिके घेतली तर तर हा दुष्काळ कधीच दूर होऊ शकत नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. वाॅटर कपच्या निमित्ताने लोक पाणीप्रश्नावर एकत्र येतात, ही फारच महत्त्वाची बाब आहे. आमीर यांच्या या कामामुळे महाराष्ट्र पाणीदार होण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

वाचा आधीची बातमी -आमीरच्या वाॅटर कप स्पर्धेत राज ठाकरे यांचे फडणवीस, अजित पवार यांना पाणीदार प्रश्न

राज ठाकरे यांना फावडे कसे वापरावे माहीत नाही...

संबंधित लेख