Ajit Pawar says - why should we close ac in the car ? | Sarkarnama

आम्ही गाडीचा एसी बंद करुन उकाड्यात मरायचे का ? -अजित पवार

मिलिंद संगई 
शनिवार, 14 एप्रिल 2018

"बाहेर चाळीसहून अधिक डिग्री सेल्सियस तापमान असताना केवळ दाखविण्यासाठी आम्ही एसी गाडी असतानाही एसी बंद करुन उकाड्यात मरायचे का ?आता सगळेच एसी गाडी वापरतात, उन्हाळ्यात एसी गाडीचा एसी वापरला तर काय हरकत आहे?

 - अजित पवार

बारामती शहर  : "बाहेर चाळीसहून अधिक डिग्री सेल्सियस तापमान असताना केवळ दाखविण्यासाठी आम्ही एसी गाडी असतानाही एसी बंद करुन उकाड्यात मरायचे का ?आता सगळेच एसी गाडी वापरतात, उन्हाळ्यात एसी गाडीचा एसी वापरला तर काय हरकत आहे? पण त्यावरही काहींनी टीका केली, आता त्याला काय करायच? ,"अशा आपल्या नेहमीच्या खास शैलीत अजित पवारांनी संघर्ष यात्रे दरम्यान झालेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. 

बारामतीत झालेल्या राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय ओबीसी जनजागृती अभियानाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. पवार म्हणाले, "आम्ही एसी बसमधून यात्रा केल्याचा आरोप झाला, आता ज्या बसमधून प्रवास करत होतो त्याला एसी होता तर एसी बंद करुन उकाड्यात उन्हाने स्वताःला त्रास करुन घ्यायचा कारण बाहेरच्यांना काय वाटेल ! असा रोखठोक सवालच अजित पवारांनी विचारला. अरे काय चाललय !" अस म्हणत त्यांनी या टीकेचीही खिल्ली उडविली. 

" सरकार नसल ना की कितीही घोषणा द्या तुमच कोणी ऐकत नाही, आमचे राव घोषणा देऊन आणि भाषण करुन घसे बसले पण या सरकारला त्याच काही देण घेण नाही, आम्ही तर नंतर दहा दहाच्या ग्रुपने आमदार घोषणा द्यायचो, पहिल्या दहा आमदारांनी दिल्यावर पुढचे दहा आमदार घोषणा द्यायचे पण घसा बसूनही सरकारवर काही परिणामच झाला नाही,"असे अजित पवारांनी आपल्या खास शैलीत सांगितले. 

 

 

संबंधित लेख