Ajit Pawar on sad demise of Atalbihari Vajpayee | Sarkarnama

अटलजींच्या निधनाने राष्ट्रसूर्याचा अस्त : अजित पवार

सरकारनामा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

मुंबई  : "माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानं राष्ट्रसूर्याचा अस्त झाला आहे. उच्च नैतिकमूल्यं व वैचारिक अधिष्ठान असलेलं राष्ट्रीय नेतृत्वं आपण गमावलं आहे," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला . 

आपल्या शोक संदेशात अजित पवार म्हणतात ," स्वपक्षासह विरोधकांचा विश्वास संपादन केलेले ते एकमेव नेते होते. प्रखर देशभक्त, संसदीय लोकशाहीवर प्रगाढ श्रद्धा, महान साहित्यिक, कविमनाचं संवेदनशील व्यक्तिमत्वं ही त्यांची ओळख होती. त्याचं वक्तृत्वं अद्वितीय होतं. त्यांच्यासारखा वक्ता, त्यांच्यासारखा नेता, त्यांच्यासारखा माणूस पुन्हा होणे नाही.सत्तारुढ आणि विरोधकांनी मिळून देशाला, लोकशाहीला पुढे घेऊन जाण्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला होता. त्यांच्या निधनानं देशाची, आंतराराष्ट्रीय राजकारणाची, लोकशाही परंपरेची मोठी हानी झाली आहे. मी त्यांच्या कार्याला, स्मृतींना, विचारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."

संबंधित लेख