ajit pawar, rally thane | Sarkarnama

शिवसेनेचे लोक सरड्यासारखे  रंग बदलतात, अजितदादांचा हल्लाबोल 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 18 जुलै 2017

ठाणे : राज्यात आतापर्यंत शिवसेनेने फक्त भावनिक राजकारण केले. शिवसेनेकडे विचारधारा उरली नाही, त्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची राहिली नाही. उद्धव ठाकरे किती वेळा भूमिका बदलतात ते त्यांनाही कळत नाही. कधी म्हणतात मोहन भागवत यांना राष्ट्रपती करा आणि कोविंद यांना न मागता पाठिंबा देतात. यामुळे ते आपल्या कोणत्याही मताशी कधीही ठाम नसतात. सरडा रंग बदलतो तसे शिवसेनेचे लोक रंग बदलतात अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज ठाण्यात झालेल्या सभेत केली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यव्यापी दौऱ्यातील दुसऱ्या टप्प्याची सांगता आज ठाणे झाली. यावेळी झालेल्या जाहीर सभेत अजित पवार बोलत होते. शिवसेनेच्या बाल्लेकिल्ल्यात पवार यांनी शिवसेनेचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. ते म्हणाले, "" समृद्धी महामार्गावर शिवसेनेच्या दुटप्पीपणा उघड झाला आहे. त्यांना शेतकऱ्याच्या हिताशी काहीही देणेघेणे नाही. ठाणे जिल्ह्याचे महत्त्व वेगळं आहे. जवळपास आमदार देणारा हा जिल्हा आहे. जो पक्ष या जिल्ह्याकडे लक्ष देईल राज्यात त्याच पक्षाचा बोलबाला असेल हे सत्य आहे. या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना पक्षश्रेष्ठींनी अनेक महत्त्वाची पदे दिली. पक्ष वाढविण्यासाठी जे शक्‍य असेल ते केले. पण त्यातले काही गद्दार निघाले. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो. तो कणा मजबूत असेल तरच पक्ष टिकेल आणि म्हणूनच आम्ही हा दौरा केला.'' 

लाखो लोकांचा रोजगार नोटाबंदीमुळे ठप्प झाला. "जीएसटी' आल्यामुळे छोटे-मोठे सर्वच व्यापारी हैराण झाले आहे. महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. काल चर्चगेट स्टेशन बाहेरही असाच प्रकार घडला. पोलीस दलाचा धाक नसल्यामुळे हे प्रकार घडत आहेत तरी सरकार याकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पण आतापर्यंत एकाही शेतकऱ्याला या माफीचा फायदा मिळाला नाही असे अजित पवार म्हणाले. 

शेतीव्यतिरिक्त शेतकऱ्यांचा कोणताही जोडधंदा असेल तर त्याला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही अशी माहिती राज्याच्या प्रमुखाने दिली. शेतकऱ्यांना कर्जमाफी कधीपर्यंत देणार याची विचारणा केली तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणतात,"" करू ! देऊ ! पण, कधी हे स्पष्टपणे कोणीच सांगत नाही. जर सरकारची आर्थिक परिस्थिती नसेल तर हजार लाख मुंबई महानगरपालिकेत पडून आहेत. त्याचा उपयोग सरकारने करावा अशी सूचनाही अजित पवार यांनी यावेळी केली. 

यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह पक्षाचे अन्य नेते यावेळी उपस्थित होते. 

संबंधित लेख