ajit pawar raj thakray mumbai | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

राजसाहेब, अजितदादाही हसतात हे घ्या फोटो ! 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर राज ठाकरे यांनी 'ते कधी तरी हसलेत का' अशी टीका केली होती. त्या टिकेने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या रणरागिणी भलत्याच संतापल्या आहे. अजितदादांच्या हसण्याची साधी माहितीही नसलेल्या ठाकरे यांना राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या मुंबई अध्यक्षा अदिती नलावडे यांनी दादांचे हसण्याचे अनेक फोटोच राज ठाकरेंना भेट म्हणून पाठवले आहेत. त्यासोबत एक पत्रही पाठवून त्यात ठाकरे यांच्याकडून करण्यात येत असलेल्या नकालावरही नलावडे यांनी जोरदार टीका केली आहे. 

अजित दादा हे पक्षाचे विधिमंडळ नेते, माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते आमचे प्रेरणास्थान आहेत. ते जनतेचे नेते आहेत म्हणूनच त्याना जनता भरघोस मतांनी निवडून देते. असे सांगून नलावडे यांनी अजितदादा यांना 1999 पासून ते 2014 पर्यंतच्या निवडणुकीत किती मते मिळाली याची आकडेवारीच दिली आहे. 

दादा हे आज सत्तेत नसताना रोज सकाळी 7 वाजता लोकांना भेटतात. त्यामुळे राजकीय नेत्यांची पात्रता ही त्यांच्या मतांच्या आकडेवारीवरून, त्यांच्या स्वीकृतीवरून ठरते. त्यामुळे राज ठाकरे यांनी लोकांच्या नकला करण्यापेक्षा दादांप्रमाणे जनतेचे प्रश्न गांभीर्याने समजून घेण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन नलावडे यांनी ठाकरे यांना केले आहे. 
 
संबंधित लेख