मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे आलेच कसे? : अजित पवार 

.
मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे आलेच कसे? : अजित पवार 

मुंबई : विधिमंडळाच्या कॅंन्टीनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे आल्याची बाब एका शासकीय कर्मचाऱ्याने निदर्शनास आणून दिली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज सभागृहात केली. 

श्री. अजित पवार म्हणाले, " अधिवेशन सुरू असताना राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येथे येतात. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 12-13 तास थांबावे लागते. त्यांना असे अन्न मिळणार असेल तर ही बाब गंभीर आहे. उसाच्या रसात वापरला जाणारा बर्फही 80 टक्के दूषित असल्याचे अहवाल आहेत. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे.'' 

या विषयावर निवदेन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, " ही घटना गंभीर आहे. विधानभवनाच्या कॅंटीनमध्ये "एफएसए' च्या निकषानुसार स्वच्छता आणि खाद्यपदार्थ आहेत की नाही? याची पाहणी तातडीने केली जाईल. याशिवाय ऑनलाइन मागणी नोंदवून अन्नपुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या किचनमध्येही गंभीर त्रुटी आढळलेल्या होत्या. त्याबाबतही कारवाई करण्यात येईल.'' 
 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com