ajit pawar press mumbai | Sarkarnama

आरक्षणासाठी शरद पवार देशातील विरोधी पक्षांचे सहकार्य मिळवतील : अजित पवार 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 जुलै 2018

पुणे : "मराठा आरक्षणाचे विधेयक संसदेत मंजूर करण्यासाठी तीन चतुर्थांश बहुमत लागेल. भाजपकडे हे बहुमत नाही. मात्र हे विधेयक संमत व्हावे यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार विरोधी पक्षांचे सहकार्य मिळवतील,'' असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

 अजित पवार म्हणाले," सध्या अस्तित्वात असलेल्या एससी, एसटी, एनटी, आणि ओबीसीसाठी असलेल्या 52 टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला 16 टक्के आणि मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण मिळावे यासाठी मागास आयोगाचा अहवाल तातडीने मिळायला हवा. या अहवालाच्या आधारे महाराष्ट्राच्या विधिमंडळात या प्रस्तावाला एकमताने मंजुरी मिळेल. त्यासाठी आम्ही सर्व विरोधीपक्ष सहकार्य करू. त्यानंतर राज्य शासनाने केंद्र सरकारकडे हे विधेयक मंजुरीला पाठवावे. संसदेत हे विधेयक तीन चतुर्थांश बहुमत लागेल. भाजपकडे हे बहुमत नाही. मात्र हे विधेयक संमत व्हावे म्हणून आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे मायावती, चंद्राबाबू नायडू, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी यांच्याशी बोलून त्यांचे सहकार्य मिळवतील. शिवसेनेचीही यासाठी मदत घ्यावी लागेल. मात्र त्यासाठी सरकारने तातडीने हालचाली करायला हव्यात.'' 

"मराठा आणि मुस्लीम समाजातील श्रीमंतांना नको पण गोरगरिबांना आरक्षण तातडीने द्यायला हवे. आम्हाला या विषयात राजकारण करायचे नाही. सरकारने आज बोलावलेली बैठक आधी बोलावली असती तर बरे झाले असते. पण "देर है पर अंधेर नही', असे म्हणून या विषयात पुढे जाण्याची गरज आहे,'' असेही अजित पवार म्हणाले.  
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख