सत्ता जाण्याच्या भितीने कर्जमाफीचा निर्णय - अजित पवार

 सत्ता जाण्याच्या भितीने कर्जमाफीचा निर्णय - अजित पवार

लातूर : शेतमालाला भाव नाही, घरात तूर पडून, पण सरकार खरेदी करायला तयार नाही, डोक्‍यावर कर्जाचे भरमसाठ ओझं यामुळे राज्यातला शेतकरी प्रचंड 
अडचणीत होता त्याला कर्जमाफी देऊन मदत देण्याची गरज होती, पण कर्जमाफीमुळे बॅंकाचा फायदा होईल असं सांगून फडणवीस सरकार चालढकल करत होते पण शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला, आता सत्ता राहते की जाते? अशी भिती वाटू लागली तेव्हा कुठे या सरकारने कर्जमाफी दिली आता किती शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली ते सरकारने स्पष्ट करावे असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी लातूरमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात केले. 

अजित पवार सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून शुक्रवारी त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. मागील अपयशाचे 
चिंतन व आढावा घेण्यासाठी हा दौरा आखल्याचे अजित पवारांनी सुरवातीलाच स्पष्ट केले. सध्या राजकारणात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. 
एखाद्या नेत्याची प्रतिमा मलिन करण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केल जातयं. आपल्या कार्यकर्त्यांनी त्याला योग्य पद्धतीने उत्तर दिले पाहिजे असे सांगतानाच सर्वांनी एकत्र मिळून काम केलं तर राज्यात पुन्हा सत्ता आणण्याची ताकद राष्ट्रवादीत निश्‍चितच आहे असा विश्‍वास अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. पक्षात पद घेऊन जर काम करता येत नसेल, तर बाजूला व्हा, दुसऱ्यांना संधी द्या ! यश आलं तर डोक्‍यात जाऊ देऊ नका, आणि अपयशाने खचून जायचे नाही ही वृत्ती राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यात दिसायला पाहिजे असे आवाहन देखील पवार यांनी यावेळी केले. पवार साहेबांचे विचार हीच आपल्या पक्षाची ताकद 
असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले. 

भाजपचे नेते बेताल... 
लोकांना सगळं फुकट लागत या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या वक्तव्यांचा अजित पवार यांनी समाचार घेतला. भाजपचे नेते बेताल वक्तव्य करत सुटले आहेत, त्यांना सत्तेची मस्ती चढली आहे. शेतकऱ्यांना हे साले म्हणतात. पण जे वरती जातात त्यांना खाली यावंच लागत हे भाजपच्या नेत्यांनी लक्षात ठेवावे असा इशारा अजित पवारांनी दिला. शेतकऱ्यांना आधारभूत किंमत दिली, तर त्यांना तुमच्या कर्जमाफीची गरज राहणार नाही असा टोला देखील पवारांनी लगावला. या सरकारला धडा शिकवण्यासाठी पक्षाची ताकद वाढवावी लागेल, जे सोबत नाहीत त्यांना सोबत घ्या. सरकार चुकले तर आदेशाची वाट पाहू नका, सरळ आंदोलन करा असा आदेशच अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com