अजित पवारांच्या वाढदिवशी राष्ट्रवादी उभारणार तीस हजार बुथप्रमुखांचे जाळे

 अजित पवारांच्या वाढदिवशी राष्ट्रवादी उभारणार तीस हजार बुथप्रमुखांचे जाळे

नाशिक : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीत झोकून दिले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला आहे. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 23 जुलै च्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक तयारीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून उत्तर महाराष्ट्रातील विभागीय बूथचे सक्षमीकरण करण्यात येईल. यानिमित्त येत्या शनिवारी होणाऱ्या निर्धार मेळाव्यात "वन बुथ टेन युथ' चा कृती कार्यक्रम जाहीर केला जाईल. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या या मेळाव्याला माजी मंत्री शशिकांत शिंदे, युवक शाखेचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ यांसह विविध पदाधिकारी उपस्थित राहतील. प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील हे युवक संघटना मजबूत करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात युवकांचे मेळावे घेत आहेत. या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक व शहराध्यक्ष अंबादास खैरे नाशिक शहर व जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी विविध उपक्रम राबवीत आहे. 

या माध्यमातून जिल्ह्यातील 15 तालुक्‍यातील 7 नगरपालिका, 8 नगरपंचायती, 1 कॅन्टोमेंट बोर्ड अशा मिळून 1968 गावातील 3027 बूथ कमिट्या आणि या बूथ कमिटीतून 1 बूथ 10 युथ या संकल्पनेप्रमाणे 30270 नवीन बूथ सदस्य जिल्ह्यात जोडले जाणार आहे. याविषयी अधिक मार्गदर्शन या बूथ सक्षमीकरण कार्यक्रमात करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित राहतील. शहर व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन पक्षाचे नाशिकचे निरीक्षक विशाल काळभोर, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शहराध्यक्ष खैरे यांनी केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com