ajit pawar on mumbai thane | Sarkarnama

शिवसेनेमुळेच मुंबई- ठाणे पाण्याखाली : अजित पवार 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 जुलै 2017

राष्ट्रवादीची सत्ता असलेले नवी मुंबई शहर पावसामुळे पाण्यात गेल्याचे कधी पहावयास मिळत नाही. पण त्याचवेळी शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई, ठाणे आणि कल्याण प्रत्येक पावसाळ्यात कायम पाण्याखाली जात असून याला शिवसेनेचा नियोजन शून्य कारभारच कारणीभूत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

ठाणे : राष्ट्रवादीची सत्ता असलेले नवी मुंबई शहर पावसामुळे पाण्यात गेल्याचे कधी पहावयास मिळत नाही. पण त्याचवेळी शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई, ठाणे आणि कल्याण प्रत्येक पावसाळ्यात कायम पाण्याखाली जात असून याला शिवसेनेचा नियोजन शून्य कारभारच कारणीभूत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

एकीकडे समृद्धी महामार्गाला विरोध करायचा आणि दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे या मार्गासाठी जमीन घेण्याच्या सोहळ्यात सहभागी होत असल्याचे पहावयास मिळत असल्याने या निमित्ताने शिवसेनेची दुप्पटी भूमिका पुन्हा एकदा लोकांसमोर आली असल्याचा टोला त्यांनी लगाविला. 

टीप टॉप हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी मार्गदर्शन मेळाव्या नंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. यावेळी प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे, आमदार जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. शिवसेनेच्या कामचुकारपणामूळे मूलभूत सोयीसुविधा देखील मुंबई, ठाणे आणि कल्याणमध्ये उभारता आलेल्या नाहीत. स्ट्रॉंग वॉटरचे नियोजन नसणे, पाइल पाईन व्यवस्थित न टाकणे, रेल्वे लाईनमध्ये पाणी तुंबणे, खड्डे पडणे हे केवळ नियोजन नसल्यानेच होत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

त्याचबरोबर कर्जमाफीच्या नावावर सरकारकडून कर्ज वसुली असल्याची टिका त्यांनी केली. किती शेतकऱ्यांना आतार्पयत कर्ज माफी मिळाली, कितीचे कोटींचे कर्ज वाटप झाले याची कोणताही माहिती सध्या उपलब्ध नाही. कारण राज्य सराकराचा जीआर हा दर पाच दिवसांनी बदलत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत नेमका काय निर्णय झाला हे अद्यापही सर्वसामान्य शेतकऱ्याला समजु शकले नसल्याचेही त्यांनी सांगितले. समृद्धी महामार्गासाठी जमीन ताब्यात घेणे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी या दोन्ही विषयावर शिवसेना दुप्पटी भूमिका घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याची टिका त्यांनी केली. 

कोपर्डीतील घटनेचा निर्णय फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमांना फाशीची शिक्षा दिली जाईल असे भाजप सरकाराने जाहीर केले होते. परंतु आज एक वर्ष उलटूनही याचा निर्णय झालेला नाही. अशा संवेदनशील विषयावरही असंवेदनशील असलेल्या सरकारचा निषेध करावा तेवढा थोडा असल्याचे पवार यांनी सांगितले. 

संबंधित लेख