Ajit Pawar Maharashtra Politics | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

अजितदादांनी आमदारांची घेतली उजळणी

तुषार खरात
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मुंबई : 'सर्व आमदारांनी सभागृहात उपस्थित राहायला हवे. सभागृहात बोलायला हवे. मुद्दे मांडताना त्याची पूर्वतयारी केली पाहीजे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी आपल्या पक्षांतील आमदारांची उजळणी घेतली.

मुंबई : 'सर्व आमदारांनी सभागृहात उपस्थित राहायला हवे. सभागृहात बोलायला हवे. मुद्दे मांडताना त्याची पूर्वतयारी केली पाहीजे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी आपल्या पक्षांतील आमदारांची उजळणी घेतली.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी काल सायंकाळी उशिरा बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी पक्षातील वरिष्ठ नेत्यांबरोबरच विधान परिषद व विधान सभेतील पक्षाचे सगळे आमदारही उपस्थित होते. 'बरेच आमदार सभागृहात उपस्थित नसतात, किंवा थोडा वेळ उपस्थित राहून नंतर निघून जातात. त्यामुळे सगळ्यांनी सभागृहात उपस्थित राहायला हवे. विशिष्ट क्षेत्रामध्ये अभ्यास असलेल्या आमदारांनी त्या विषयांवर प्रभावीपणे बोलायला हवे. नवीन असलेले आमदार सभागृहात फार बोलत नाहीत. त्यांनीही बोलले पाहिजे. जुन्या आमदारांनी नव्या आमदारांना बोलायला संधी दिली पाहीजे,' असा उपदेश अजितदादांनी दिला. येत्या शनिवारी विधीमंडळातर्फे शरद पवार यांच्या अभिनंदनाचा सोहळा आहे. त्यासाठी सुद्धा सगळ्या आमदारांनी उपस्थित राहा, असेही अजितदादांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वत: अजितदादा ठिकठिकाणच्या जाहीर सभांमधून सरकारला झोडून काढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारविरोधातील धार आणखी तीव्र करण्याच्या अनुषंगाने त्यांनी सर्व आमदारांची उजळणी घेतल्याची सूत्रांनी सांगितले.

संबंधित लेख