ajit pawar, jayant patil local train | Sarkarnama

अजित पवार, जयंत पाटील यांचा बऱ्याच वर्षांनी लोकल ट्रेन प्रवास

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज संध्याकाळी लोकल ट्रेनमधून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली असा प्रवास केला.
 
डोंबिवली येथे एका कार्यक्रमाला कारने जाण्यासाठी ट्रॅफिकचा अडथळा येवू शकतो त्यामुळे कार्यक्रमाला वेळेत पोचता येणार नाही हा विचार करुन अजितदादा पवार यांनी लोकल ट्रेनने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला.
 
त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार प्रकाश गजभिये, माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर नेते उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांनी बऱ्याच वर्षांनी लोकन ट्रेनने प्रवास केल्याची चर्चा या निमित्ताने झाले.
 
संबंधित लेख