ajit pawar on elections | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

लोकसभा- विधानसभेच्या एकत्रित निवडणुका पुढीलवर्षी : अजित पवार 

सरकारनामा ब्युराे
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

सोलापूर : मोदीसरकारच्या विरोधात देशात वातावरण तयार होत असल्याने 2018 मध्येच लोकसभा व महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होतील, असे भाकित राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, मोदी व फडणवीस सरकारच्या कामगिरीवर लोक नाराज आहेत. त्यांनी दिलेली आश्‍वासने प्रत्यक्षात आलेली नाहीत. या दोन्ही सरकारच्या विरोधी वातावरण तयार होत आहे. त्यामुळे 2018 मध्येच लोकसभेची निवडणूक घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या भाजप शासित राज्यांच्या निवडणुकांप्रमाणे ही निवडणूक होऊ शकते. महाराष्ट्राची निवडणूकही ते वर्षभर अगोदर घेऊ शकतात, असे पवार म्हणाले. 

संबंधित लेख