AJIT PAWAR CRITICIZES GOVT | Sarkarnama

खोटे बोल पण रेटून बोल, हीच सरकारची कामगिरी : अजित पवार

जनार्दन दांडगे
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

लोणी काळभोर : `खोटे बोल पण रेटून बोल,` अशी चार वर्षातील केंद्र व राज्य सरकारची कामगिरी राहिली आहे. आगामी निवडणुकीत या फसव्या केंद्र व राज्य सरकारला सत्तेवरुन घालवण्यासाठी सर्वानीच एकत्र येण्याची गरज आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे व्यक्त केले.

लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सुमारे सहा कोटी एकोणचाळीस लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या जाहीर कार्यक्रमात बोलताना पवार यांनी सरकारवर टीका केली.

यावेळी बोलताना पवार म्हणाले, `केंद्रात आणि राज्यात सरकार येण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाने मोठी स्वप्ने दाखविली. आश्वासनांचे गाजर दिले. मात्र, या राज्यात सत्तेत येऊन चार वर्षे झाली तरी आश्वासनांची पूर्तता काही झाली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाला आरक्षण मिळावे, याची मागणी आहे. परंतु या सरकारने फक्त चर्चेचे गुऱहाळ चालू ठेवले आहे. गाजतवाजत जाहीर केलेल्या कर्जमाफीतून एकाही शेतकऱ्यांची पुर्ण कर्जमाफी झालेली नाही. उलट या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. या सरकारला सत्तेवरुन घालवण्यासाठी आगामी काळात आपापसांतील गटतटांनी एकत्र काम करण्याची गरज आहे.``

संबंधित लेख