Ajit Pawar Criticises Uddhav Thakre | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

माझ्या तोंडातला बोळा उद्धव ठाकरेंनी कधी पाहिला : अजित पवार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 जुलै 2017

शिवसेना सरकामध्ये राहून सरकाविरोधातही बोलत आहे, त्यामुळे त्यांना गांडूळ म्हणालो तर काय चुकले? त्यिांच्या नाकाला मिरच्या का झोंबल्या? हे कळत नाही. शिवसेना ढोल कुणाच्या नावाने ढोल बडवित आहेत हेच कळत नाही.- अजित पवार

जळगाव : सरकारमध्ये सत्ता उपभोगायची आणि त्याच सरकारच्या विरोधात बोलायचे अशा वागण्याला गांडूळ म्हणालो यात आपले काहीच चुकले नाही. उध्दव ठाकरे यांच्या नाकाला मिरच्या का झोंबल्या? माझ्या तोंडात बोळा आहे की नाही हे पहायला ते मला कधी भेटले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जळगाव येथे बोलतांना लगावला.

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जोरदार वाद सुरू आहे. सरकारमध्ये राहून सरकारच्या विरोधातही बोलतात शिवसेना ही गांडूळा प्रमाणे आहे, असे वक्तव्य पवार यांनी यांनी केले होते. त्या वक्‍तव्याचा उध्दव ठाकरे यांनी जळगाव दौऱ्यात जोरदार समाचार घेतला होता. काल ते जळगाव दौऱ्यावर होते. धरणगाव येथील जाहिर सभेत त्यांनी अजित पवारावर शाब्दीक हल्ला चढवित आम्हाला गांडुळ म्हणणारे पवार शेतकरी कर्जमाफीबाबत शासनाविरूध्द काहीही बोलत नाहीत. त्यांच्या तोंडात भ्रष्टाचाराचा बोळा कोबला आहे काय? असा सवाल केला होता.

ठाकरे यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी आज जोरदार टोला जळगाव येथेच लगावला. पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात होता. त्यावेळी बोलतांना ते म्हणाले, ''शिवसेना सरकामध्ये राहून सरकाविरोधातही बोलत आहे, त्यामुळे त्यांना गांडूळ म्हणालो तर काय चुकले? त्यिांच्या नाकाला मिरच्या का झोंबल्या? हे कळत नाही. शिवसेना ढोल कुणाच्या नावाने ढोल बडवित आहेत हेच कळत नाही. ते या राज्यातील शेतकरी दुध खुळा वाटतोय काय?सत्तेत रहायचे आणि कर्जमाफी झाली नाही म्हणून ओरडायचे हे चुकिचे आहे, त्यांनी हा प्रकार बंद करावा. माझ्या तोंडात काय कोंबले आहे हे पाहण्यासाठी ते कधी आले होते. गेल्या अनेक वर्षापासून आमची भेट नाही.''

कृषी मंत्री दाखवा हजार रूपये मिळवा
राज्याचे कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांच्यावरही पवार यानीं टिका केली, ते म्हणाले, ''राज्यात शेतीचा प्रश्‍न अत्यंत गंभीर आहे, परंतु कृषीमंत्री आहेत कुठे?हेच कळत नाही. "देवीचा रोगी कळवा हजार रूपये मिळवा'या घोषणेप्रमाणे कृषी मंत्री दाखवा आणि हजार रूपये मिळवा अशी घोषणा करावी लागणार काय असे वाटू लागले आहे.''

संबंधित लेख