ajit pawar criticise sambhaji bhide in akole | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

संभाजी भिडेंची प्रवृत्ती ठेचा; अजितदादांचा आदेश! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

मनु हा संत ज्ञानेश्‍वर व तुकारामापेक्षा श्रेष्ठ आहे, असं म्हणणाऱ्या संभाजी भिडेंची प्रवृत्ती ठेचून काढा, असा हल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केला. 

अकोले (जि. नगर) : मनु हा संत ज्ञानेश्‍वर व तुकारामापेक्षा श्रेष्ठ आहे, असं म्हणणाऱ्या संभाजी भिडेंची प्रवृत्ती ठेचून काढा, असा हल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केला. 

अकोले तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. पवार म्हणाले, की वारकरी विचार पुढे नेला पाहिजे. दाभोळकर, पानसरेंची हत्या का झाली? याचे मास्टर माइंड कोण आहेत, याचा शोध घेणे गरजेचे आहे. 

राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड, राहुल जगताप, संग्राम जगताप यांच्याबरोबर प्रत्येक तालुक्‍यात राष्ट्रवादीचा आमदार निवडून द्यावा. मधुकरराव पिचडांनी तालुक्‍याला आयुष्यभर जपले, त्याप्रमाणेच आपणाला वैभव पिचडांनी भरभरुन पाठिंबा द्यावा लागेल, असे आवाहन पवार यांनी केले. 

संबंधित लेख