ajit pawar criticise phadawnis goverenment | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

भाजप सरकार शेतकरीविरोधी: अजित पवार 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 15 एप्रिल 2017

कुलभूषण जाधव यांचा कोणताही दोष नसताना त्यांना पाकिस्तानच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या सुटकेसाठी पंतप्रधानांनी सर्वस्व पणाला लावून प्रयत्न करायला हवेत. अन्यथा पाकिस्तानचे नाक अशा पद्धतीने दाबा की त्यांचे तोंड उघडेल. यासाठी आम्ही सर्व पंतप्रधानांच्या पाठीशी आहोत. 
-अजित पवार 

सातारा : बड्या धेंड्यांची कर्जे सरकार भरत असून त्यांच्या बॅंकांना एनपीएतून बाहेर काढत आहे. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करत नाही, शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे भाजप सरकारचे धोरण आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

ते साताऱ्यातील कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, देशात साखर मोठ्याप्रमाणात उपलब्ध असताना भाजप सरकारने परदेशातून पाच हजार मेट्रिक टन साखर आयात केली आहे. यातून साखरधंदा अडचणीत येणार आहे. संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा सातारा जिल्ह्यातून घेण्याच्या दृष्टीने विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

 

संबंधित लेख