ajit pawar comments about drinkers | Sarkarnama

ब्रह्मदेवा, तू खाली आला तरीही ही लोकं सुधारायची नाहीत : अजित पवार

मंगेश कचरे
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

इंदापूर : जाहीर सभेत वक्त्यावर काय वेळ येईल, हे सांगता येत नाही. आता हेच पाहाना व्यसनमुक्तीवर खुद्द माजी उपममुख्यमंत्री अजित पवार हे बोलत असताना त्यांच्या भाषणाच्या वेळी एक मद्यपीच डुलतडुलत तेथे सभेत दादांसमोर येऊन आला. काय म्हणावे या विसंगतीला!

इंदापूर तालुक्यातील काझड या गावात  उपस्थितांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांना गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी एका महिलेने निवेदन दिले होते. त्यावर पवार यांनी या गावात दारू विकली जाते हे नक्की असून व्यसनाधीन होऊ नका, असा सल्ला दिला आणि नेमके त्याच वेळी दारू पिलेला गृहस्थ व्यासपीठासमोर आला.

भाषण सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने अजित पवार यांनाही आश्चर्य वाटले. भाषणातच त्यांनी, व्यसनाधीन होऊ नका असे सांगत स्वर्गीय आर. आर. पाटील यांचे उदाहरण दिले होते. मात्र एवढे सांगूनही भाषणादरम्यान आलेल्या या तळीरामाला बघत पवार यांनी मिश्किल शैलीत टीप्पणी केली,

त्या तळीरामाला बघत पवार यांनी त्यांचे भाषण थांबवत "हा काय चंद्रावरती गेला वाटतं, एवढ भाषणं करून देखील माझ्यासमोरच हा डुलत डुलत आलाय..,  आता काय करायचे, कधी कधी वाटते ब्रह्मदेवा तू खाली आला तरीही ही लोकं सुधारायची नाहीत, असे पवार म्हणताच सभेत एकच हशा पिकला.

संबंधित लेख