ajit pawar comment about vijaykumar deshmukh | Sarkarnama

अजितदादांनी 'काडी' टाकली, पण विजयकुमार देशमुखांनी विझवली! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 11 जुलै 2018

पुणे: शेतकरी कर्जमाफीसंबंधाने काल विधान सभेत झालेल्या चर्चेवेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर विरोधकांनी टिकाटिप्पण्णी केली होती. आज सुभाष देशमुखांनी त्याला उत्तर दिले. यादरम्यान, अजित पवार यांनी सुभाष देशमुख व विजयकुमार देशमुख यांच्यातील संघर्ष पेटविण्याचा प्रयत्न केला. 

सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यातील संघर्ष सर्वज्ञात आहे. बाजार समिती निवडणुकीत दोन्ही देशमुखांची पॅनेल एकमेकांसमोर आली होती. 

अजित पवार यांनी काल कर्जमाफीवर बोलत असताना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निकालावर टिप्पणी केली होती. या निवडणुकीत मंत्री सुभाष देशमुख यांचा पराभव झाल्याचे पवार म्हणाले होते. यावर सुभाष देशमुख यांनी सविस्तर उत्तर दिले. त्यावेळी देशमुखांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली. यादरम्यान अजित पवार यांनी मधेच उठून हस्तक्षेप केला.

पवार म्हणाले, "मला मंत्री विजयुकमार देशमुख सभागृहात भेटले. ते म्हणाले, बाजार समितीला पॅनेल निवडून आले. त्यावर मी विचारले विरोधात कोण होते? मंत्री सुभाष देशमुख विरोधात होते, असे उत्तर त्यांनी दिले, म्हणून मी बोललो', असा हसत हसत खुलासा केला. त्यावर परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख तातडीने उभे राहिले. ते म्हणाले, मी अजितदादांना काही सांगितलेले नाही. त्यांनीच मला विचारले, निवडून आला कां? मी फक्‍त हो म्हणालो. विजयकुमार देशमुखांनी लगेच खुलासा केल्याने अजित पवारांचा उद्देश पुर्णपणे सफल होवू शकला नाही. 

संबंधित लेख