ajit [pawar cabinet monister ubsent | Sarkarnama

कॅबिनेट मंत्री गायब, अजितदादा भडकले 

ब्रह्मा चट्टे 
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

मुंबई : आज अर्थसंकल्पिय अधिवेशाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांनी चौथ्यांदा विधानसभेचे कामकाज बंद पाडले. राज्यपालांच्या अभिभाषणांवर चर्चाच्या वेळी राज्यातील मुख्यमंत्र्यांसह कॅंबिनेट मंत्रीही गैर हजर राहल्यामुळे विधानसभेचे कामकाज 15 मिनीटांसाठी तहकूब करण्यात आले. 

मुंबई : आज अर्थसंकल्पिय अधिवेशाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांनी चौथ्यांदा विधानसभेचे कामकाज बंद पाडले. राज्यपालांच्या अभिभाषणांवर चर्चाच्या वेळी राज्यातील मुख्यमंत्र्यांसह कॅंबिनेट मंत्रीही गैर हजर राहल्यामुळे विधानसभेचे कामकाज 15 मिनीटांसाठी तहकूब करण्यात आले. 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना हरकत घेत पहिल्या रांगेत एकही मंत्री उपस्थीत नसल्याचे तालिका अध्यक्ष योगेश सागर यांच्या निदर्शनास आणून दिले. पवार म्हणाले, " आज अर्थसंकल्पिय आधिवेशनाचा तिसराच दिवस आहे. परंतू मुख्यमंत्र्यांसह पहिल्या रांगेतील सगळे कॅबिनेट मंत्री गायब आहेत. याला कारभार म्हणायचा काय ? काय चाललयं ? राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरूयं याचं तर भान ठेवा. निदान मुख्यमंत्री नाहीत. त्यांना दिल्लीत महत्वाच काम आहे हे आम्ही समजू शकतो पण, बाकीच्या मंत्र्यांचे काय ? बाकीचे मंत्री काय झोपा काढत आहेत काय ? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी विचारला. 

यावर बसल्या जागेवरूनच सहकार मंत्री सुभाष देशमुख "आम्ही आहोत तुम्ही सुरू करा" असे म्हणाल्याने अजितदादा अधिकच चिडले, " तुम्ही राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देणार आहात काय ? तसं असेल तर सांगा आम्ही आमचं भाषण सुरू करतो. राज्याचे सन्मानिय विरोधी पक्षनेते राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलणार आहेत. मंत्र्यांना बोलवा. तोपर्यंत कामकाज थांबवा असा आग्रह पवार यांच्यासह विरोधकांनी लावून धरला. त्यानंतर संसदिय कार्यमंत्री विनोद तावडे विधानसभेत आले. 

त्यांनी कामकाज सुरू करण्याची विनंती केली. तरीही विरोधकांनी मंत्र्यांना बोलवण्याची मागणी लावून धरल्याने विधानसभेत मंत्री उपस्थित नसल्याने 15 मिनीटांसाठी विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. सकाळी कामराज सुरू झाल्यापासून चौथ्यांदा विरोधकांनी विधानसभेचे कामकाज बंद पाडले. 

संबंधित लेख