ajit pawar assembly news | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

देशात 277 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर
देशात एनडीएचे 314 उमेदवार आघाडीवर असून यूपीएचे 112 उमेदवार आघाडीवर आहे.
पूनम महाजन - 850 मतांनी आघाडीवर, प्रिया दत्त पिछाडीवर
राहुल गांधी पिछाडीवरून पुन्हा आघाडीवर
पुणे : पहिल्या फेरित एनडीए तीनशे जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
रायबरेलीत सोनिया गांधी आघाडीवर आहेत
दक्षिण मध्य मुंबईत पहिल्या फेरीत शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे आघाडीवर...

मंत्री चेंबरमध्ये अंडी उबवतात काय ? अजित पवार भडकले 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 मार्च 2018

मुंबई : मंत्र्यांना कामकाजात भाग घ्यायला काय अडचण आहे ? मंत्री चेंबरमध्ये अंडी उबवतात काय ? महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू आहे. कोणीच उपस्थित 
नाही. हे मंत्री किती कोडगे झाले आहेत असा संताप व्यक्त करत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी विधानसभेत सरकारला कोंडीत पकडले. मंत्र्यांच्या विधानसभेतील उपस्थितीवर प्रश्न विचारत पवार यांनी अध्यक्षांनाच खिंडीत गाठले. 

विधानसभेत आज विरोधकांच्या वतीने नियम 293 अन्वये दाखल केलेल्या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.

त्यावेळी हरकत घेत पवार म्हणाले,"" माजी हरकत आहे अध्यक्ष महोदय, कामकाज सुरू असताना सभागहात एकच मंत्री उपस्थित आहेत. बाकीचे मंत्री कुठे आहेत ? त्यांना कामकाजात भाग घ्यायला काय अडचण आहे? मंत्री चेंबरमध्ये अंडी उबतात काय ? महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू आहे. कोणीच उपस्थित नाही. हे मंत्री किती कोडगे झाले आहेत. विरोधी पक्षाचे नेते बोलत आहेत. मदत व पुनर्वसन, सहकार, कृषी या विभागाचा संबंध असलेला विषय सुरू आहे. यावेळी संबंधित मंत्री असायला हवे. एकच मंत्री हजर आहे. राज पुरोहित काय भाजी बनवताय का ? विरोधी पक्षाचा अपमान आहे. त्यामुळे मंत्री येईपर्यंत कामकाज तहकूब करा. त्यांना तुम्ही बोलवण्याचे आदेश द्या. " 

अजित पवार यांच्या या रौद्रावतारावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे ही आवाक्‌ झाले होते. शेवटी भाजपचे विधानसभेचे प्रतोद राज पुरोहित यांना मंत्र्यांना बोलवण्यास अध्यक्षांनी सुचना देत विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांना बोलण्याची विनंती केली.  

संबंधित लेख