ajit pawar and thakare | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

अडगळीत पडलेल्या अजित पवारांनी मला शिकवू नये - उध्दव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : राम मंदिराचा मुद्दा काढला तर तुमच्या पोटात मुरडा का उठला असा सवाल करत अडगळीत पडलेल्या अजित पवारांनी पक्ष कसा चालवायचा हे मला शिकवू नये असा टोला राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना औरंगाबादेत लगावला. उध्दव ठाकरे यांनी आधी बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक बांधावे, राम मंदिर कधी बांधणार याची तारीख जाहीर करावी असे आव्हान देत अजित पवार यांनी उध्दव ठाकरे व शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. याला उध्दव ठाकरे यांनी देखील औरंगाबाद येथील गटप्रमुखांच्या मेळाव्यात उत्तर दिले. 

उध्दव ठाकरे म्हणाले, राम मंदिराचा मुद्दा काढला म्हणून तुमच्या पोटात मुरडा का उठलाय? माझा पक्ष कसा चालवायचा ते मी बघून घेईन, लोक ज्यांना विसरले, जे अडगळीत पडले अशा अजित पवारांनी मला शिकवण्याची गरज नाही. उलट तुम्हाला माझे सांगणे आहे, राज्यात दुष्काळ पडला आहे, धरणं कोरडी पडली आहेत. पण अजित पवारांना धरणाच्या आसपास देखील फिरकू देऊ नका. तुम्ही घरातले पिप भरा, धरणाचे आम्ही बघून घेऊ अशी टीका देखील उध्दव ठाकरे यांनी अजित पवारांवर केली. 

संबंधित लेख