ajit pawar and devendra | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...
हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

पांडुरंगच मुख्यमंत्र्यांना म्हणेल माझी पुजा करू नका - अजित पवार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 मार्च 2018

मुंबई : पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये गॅंगवॉर वाढले आहे. त्या परिसरात रोज गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याचे प्रसिद्ध होत आहे, पंढरपूरला गुढीपाडव्याच्या दिवशी गॅंगवार झाले त्यात एकाची हत्या झाली. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे अन्यथा पुढच्या वर्षी पांडुरंगच म्हणेल की माझी पुजा करू नका, तुम्हाला कायदा सुव्यवस्था नीट ठेवता येत नाही, असा चिमटा राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना काढला. नियम 293 अंतर्गत विरोधी पक्षांनी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर मांडलेल्या प्रस्तावावर अजित पवार विधानसभेत बोलत होते. 

अजित पवार म्हणाले," हे सरकार आल्यापासून राज्याची कायदा सुव्यवस्था अत्यंत बिघडली आहे. सरकारने सांगितले होते की "मेक इन महाराष्ट्र, मेक इन इंडिया, मॅग्नेटीक महाराष्ट्र' या योजनांच्या माध्यमातून राज्यात रोजगार निर्माण केला जाईल पण हे काही खरे होणार नाही असे दिसत आहे. तरुणांचे रोजगार गेले आहेत. उद्योगपतींना गुंड लोक त्रास देत आहेत. त्यांना पोलिस संरक्षण दिले जात नाही. उद्योगपती म्हणतात, आम्हाला संरक्षण मिळत नाही, कशी गुंतवणूक करायची त्यामुळे उद्योग येत नाहीत. यामुळे रोजगार निर्माण होणार नाही. रोजगारासाठी तरुण आज आंदोलन पुकारत आहे. तरुणांच्या मनात एक अस्वस्थता आहे. सरकारने गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करायला हवा. पोलिसांचा दरारा राहिला नाही. पोलिस दलाला बदनाम करणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले. 

अजित पवार पुढे म्हणाले," पिंपरी चिंचवड ही उद्योग नगरी होती. तिचं रूपांतर तोडफोड नगरीमध्ये झाली आहे. एका वर्षात तोडफोडीचे अनेक प्रकार घडले. हे कोण करतंय याचा तपास सरकारने घ्यायला हवा. राज्यात गुटखा आणि गांजा बेकायदेशीररित्या आणला जात आहे. वाळू माफियांचा सुळसुळाट वाढला आहे. अधिकारी जर कारवाई करत असेल तर वाळू माफिया त्यांना ठार मारण्याची भूमिका घेतात. सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे. या गुन्हेगारांवर कारवाई करायला हवी. राजकीय पक्षांनी स्वच्छ चारित्र्याचे लोक आपल्या पक्षात ठेवावे, त्यांच्यावर किती केसेस आहेत, कसल्या कसेस आहेत ते तपासून पहावे. पक्षाची बदनामी होणार नाही, आपल्या पदाची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी, असा चिमटाही अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना काढला. 
 
संबंधित लेख