Ajit Pawar Akola Tour | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

अजितदादा म्हणाले संग्राम जोमाने कामाला लागा...

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 डिसेंबर 2018

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अजित पवार यांनी शुक्रवार (ता.21) मुंबईत अकोला जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे उपस्थित होते. गावंडे यांनी गेल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने जनसमस्यांवर केलेल्या विविध आंदोलनांची माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती, सामाजीक समीकरणासह राष्ट्रवादीसाठी असलेले पोषक वातावरणाची माहिती दिली. 

अकोला : ''आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन होणार आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भाग पिंजून काढत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष संघटन अधिक मजबुत करण्यावर भर द्या. संग्राम आता वेळ आली असुन जोमाने कामाला लागा," असा सुचक सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांना दिला. 

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अजित पवार यांनी शुक्रवार (ता.21) मुंबईत अकोला जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे उपस्थित होते. गावंडे यांनी गेल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने जनसमस्यांवर केलेल्या विविध आंदोलनांची माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती, सामाजीक समीकरणासह राष्ट्रवादीसाठी असलेले पोषक वातावरणाची माहिती दिली. 

यावेळी अजित पवार म्हणाले, "लोकसभा आणि विधानसभेत सत्ता परिवर्तन निश्चितच होणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. भाजप-शिवसेना सरकारने जनतेचे भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे जनतेमध्ये या सरकारप्रती प्रचंड असंतोष आहे. याच मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अधिक आक्रमक होत जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा." जिल्ह्यातील जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांची सांगड घालून नव्या दमाने कामाला लागा, असा सल्लाही अजित पवार यांनी संग्राम गावंडे यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संबंधित लेख