ajit pawar to adderss rallies in baramati on Wednesday | Sarkarnama

अजित पवार बुधवारी बारामतीत विरोधकांना उत्तर देणार

कल्याण पाचंगणे
सोमवार, 15 एप्रिल 2019

माळेगाव : बारामतीत लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार शिगेला पोचला आहे. विशेषतः बारामती तालुक्याच्या साखर पट्ट्याकडे आता राष्ट्रवादी काॅग्रेस, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येते.

त्या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवार (ता. 17) रोजी उमेदवार सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ माळेगाव, सोमेश्वर साखर कारखान्याच्या पट्ट्यात जाहिर सभा घेण्याचे निश्चित केले आहे.

बुधवारी सकाळी साडेआठ वाजता नीरावागज ग्रामपंचायत कार्य़ालयासमोर पहिली सभा होणार आहे. त्याचदिवशी साडेदहा वाजता सांगवी, तर साडेआकरा वाजता माळेगाव बुद्रूक येथे पवार मतदारांना मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी अडीच वाजता वडगाव निंबाळकर, साडेचार वाजता करंजेपूल व सहा वाजता सुपे येथे सभेचे आयोजन केले आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, कार्यकर्ते रविराज तावरे यांनी दिली.

दरम्यान, माळेगाव व सोमेश्वर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात याआगोदर राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ प्रचाराचा धुरळा उडविला होता. याशिवाय तालुक्याच्या जिरायती भागात (सुपे) खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची लक्षवेधी सभा झाली व त्यांनी मतदारांना भाजपकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्राप्त स्थितीचा विचार करता बुधवारी आयोजित केलेल्या अजित पवार यांच्या सभेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 
 
संबंधित लेख