ajit pawar about dhangar reservation | Sarkarnama

धनगरांना आदिवासींत घुसडू नका, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या : अजित पवार

विद्याचंद्र सातपुते 
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

रामाच्या नावाने सत्तेवर आलेल्या भाजप सरकारचे आमदार राम कदम यांचे नाव रावण कदम असायला पाहिजे. 

- अजित पवार 

अकोले (जि. नगर) : धनगर समाजाला आदिवासींत घुसडू नका. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, अशी मागणी करत आरक्षणाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी राष्ट्रवादीला साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली. 

अकोले तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव पिचड होते. या वेळी व्यासपिठावर आमदार शशिकांत शिंदे, आमदार वैभव पिचड, जिल्हा बॅंकेचे सीताराम गायकर, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, पुर्वीच्या 52 टक्के आरक्षणाला हात न लावता मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. दोन्ही समाजाने केलेली मोठी आंदोलने सरकारला दिसत नाहीत काय? 

संबंधित लेख