ajit pawar about baramati seat winning | Sarkarnama

एकट्याच्या ताकदीवर निवडून आलोय; अजितदादांनी 'कमळाबाई'ला सुनावले! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 10 जुलै 2018

पुणे: "मी एकट्याच्या ताकदीवर बारामतीतून निवडून आलोय. तुमच्यासारखा लाटेत निवडून आलो नाही', अशा शब्दांत अजित पवार यांनी भाजपच्या सदस्यांना टोला लगावला. 

नागपूर अधिवेशनात अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीवरुन सरकारला लक्ष्य केले. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्‍वासन मोदींनी दिल्याने लोकांनी कमळाला मते दिली आणि कमळाबाई निवडून आली, असे विधान त्यांनी केले. त्यावर भाजप सदस्यांनी कमळाबाई शब्दावर हरकत घेतली. त्यावर कोणाच्या भावना दुखावल्या असत्या तर हा शब्द मागे घेण्याची तयारी असल्याचे पवार म्हणाले. 

कमळाबाई हा शब्द बाळासाहेब ठाकरे वापरत होते, तो शब्द तुम्ही चालवून, पचवून घेत होता, असा चिमटा त्यांनी काढला. त्यावरही भाजप सदस्यांनी विरोध केल्याने "मी एकट्याच्या ताकदीवर बारामतीतून निवडून आलोय. तुमच्यासारखा लाटेत निवडून आले नाही', असे पवार यांनी सुनावले. 

संबंधित लेख