ajit pawar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे नवी दिल्लीत निधन

अजित पवार परदेश दौऱ्यावर? 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार या दोघांनीच अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत. राज हे निवडून आलेल्या नगरसेवकांना "कृष्णकुंज'वर भेटत आहेत. मनसेचे नवीन नगरसेवक तसे फोटो सोशल मिडियावर शेअर करीत आहेत. इकडे अजित पवारांचा काही ठावठिकाणा नाही. त्यांच्या पक्षाचे नगरसेवकही त्यांना फोन करून कंटाळले. पण तो फोन अद्याप स्वीच ऑफच येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अनेक नेत्यांना दादांकडे "मन मोकळं' करायचं आहे. प्रसारमाध्यमे दादांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहेत.

जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार या दोघांनीच अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत. राज हे निवडून आलेल्या नगरसेवकांना "कृष्णकुंज'वर भेटत आहेत. मनसेचे नवीन नगरसेवक तसे फोटो सोशल मिडियावर शेअर करीत आहेत. इकडे अजित पवारांचा काही ठावठिकाणा नाही. त्यांच्या पक्षाचे नगरसेवकही त्यांना फोन करून कंटाळले. पण तो फोन अद्याप स्वीच ऑफच येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अनेक नेत्यांना दादांकडे "मन मोकळं' करायचं आहे. प्रसारमाध्यमे दादांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहेत. निकालाच्या धक्‍क्‍यामुळे ते मौनात आहेत की नवीन राजकीय युतीच्या प्रयत्नात आहेत, याचा काही अंदाज लागत नाही. 2009 मधील विधानसभेच्या निकालानंतर दादा असेच "गायब' झाले होते. तेव्हा ते कॉंग्रेसला डच्चू मारून सेना-भाजपशी हातमिळवणी करत असल्याची चर्चा पसरली होती. आता तर भाजप सरकार पाडण्याची संधी चालून आली आहे. दादा त्याच तयारीसाठी परदेश दौऱ्यावर गेले तर नाहीत ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. 
 

संबंधित लेख