aims bulletin about atalbihari vajpeyi | Sarkarnama

अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती गेल्या 24 तासांत खालावली आहे. एम्सने मेडीकल बुलेटिन जारी करुन ही माहिती दिली आहे. 

दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती गेल्या 24 तासांत खालावली आहे. एम्सने मेडीकल बुलेटिन जारी करुन ही माहिती दिली आहे. 

दोन महिन्यांपुर्वी प्रकृती खालावल्याने वाजपेयींना एम्समध्ये दाखल केले हाते, मात्र त्यावेळी कोणताही धोका नसल्याचा खुलासा एम्सने केला होता. आज देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाजपेयींच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेल्याचे वृत्त आले. त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुढे येत होती. दरम्यान, रात्री उशिरा एम्सने बुलेटिन जारी करुन प्रकृती खालावल्याचे म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख