ahmed patel mp | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

आजचा वाढदिवस : अहमद पटेल, खासदार (राज्यसभा) 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

अहमद पटेल कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. नेहरू-गांधी घराण्याशी त्यांची नेहमीच जवळीक राहिली आहे. कॉंग्रेसच्या या निष्ठावंत नेत्यावर पक्षाने आतापर्यंत विविध जबाबदाऱ्या टाकल्या आणि त्यांनी त्या तितक्‍याच जबाबदारीने पार पाडल्या. 1976 मध्ये गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पटेल यांनी राजकारणाला सुरवात केली. कॉंग्रेसचे माजी पंतप्रधान राजीव गांधींचे ते संसदीय सचिव होते. ऑगस्ट 2017 रोजी अहमद पटेल यांनी भाजपचे उमेदवार बलवंत सिंग यांचा पराभव करून ते राज्यसभेवर निवडून गेले. लोकसभा, राज्यसभा अशा दोन्ही ठिकाणी त्यांनी निवडून येऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अहमद पटेल कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. नेहरू-गांधी घराण्याशी त्यांची नेहमीच जवळीक राहिली आहे. कॉंग्रेसच्या या निष्ठावंत नेत्यावर पक्षाने आतापर्यंत विविध जबाबदाऱ्या टाकल्या आणि त्यांनी त्या तितक्‍याच जबाबदारीने पार पाडल्या. 1976 मध्ये गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पटेल यांनी राजकारणाला सुरवात केली. कॉंग्रेसचे माजी पंतप्रधान राजीव गांधींचे ते संसदीय सचिव होते. ऑगस्ट 2017 रोजी अहमद पटेल यांनी भाजपचे उमेदवार बलवंत सिंग यांचा पराभव करून ते राज्यसभेवर निवडून गेले. लोकसभा, राज्यसभा अशा दोन्ही ठिकाणी त्यांनी निवडून येऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2001 पासून कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव आहेत आणि 2004 आणि 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीचा मोठ्या प्रमाणात श्रेय आहे. 2004 ते 2014 च्या दरम्यान "यूपीए' सरकारच्या काळात पटेल हे सरकार आणि पक्ष यांच्यातील प्रमुख समन्वयक होते. 

संबंधित लेख