ahmadnagar muncipal election declared | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

नगर महापालिकेचा बिगुल वाजला; जगताप, राठोडांच्या प्रतिष्ठेची निवडणूक!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

मतदान ९ डिसेंबरला होत आहे.

नगर : नगर महापालिकेच्या मतदानाची तारीख निश्चित झाल्याने आजपासून आचारसंहिता लागली.  ही महापालिका आपल्याच ताब्यात खेचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप व शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करीत मोर्चेबांधणी केली आहे.

नगर महापालिकेसाठी आज मतदानाची तारीख निश्चित झाली आहे. मतदान ९ डिसेंबरला होत आहे.

मागील एक महिन्यांपासूनच सर्वच पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. प्रत्येक पक्षात इनकमिंग-आऊटगोईंग सुरू आहे. उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांनी पक्षांतर केले.  

शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी इतर पक्षातील इच्छुकांना पक्षात प्रवेश देऊन पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे शिवसेनेतील काही मंडळींनी राष्ट्रवादी व भाजपमध्ये प्रवेश केला. शेकडो युवकांचा लवाजमा घेवून शहराच्या प्रत्येक प्रभागात कार्यक्रम करण्याचा सपाटा राष्ट्रवादीचे आमदार जगताप यांनी लावलाच होता. मागील पंधरा दिवसांत अनेकांनी जगताप यांचे नेतृत्त्व मान्य करीत पक्षात प्रवेश केला. एकूणच सर्वच पक्षातील पळवापळवी आता थांबणार आहे. उमेदवार निश्चिती होणार असल्याने सर्वच नेत्यांमध्ये जुळवाजुळवी सुरू आहे.

निवडणूक कार्यक्रम असा :
नामनिर्देशन दाखल करणे : १३ ते २० डिसेंबर
छाननी : २२ नोव्हेंबर
उमेदवारी मागे घेणे : २६ नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह वाटप : २७ नोव्हेंबर
मतदान : ९ डिसेंबर
मतमोजणी : १० डिसेंबर

संबंधित लेख