Ahire Grampanchayat nikal | Sarkarnama

अहिरेची सत्ता पुन्हा रमेश वांजळेंच्या कुटुंबाकडे 

राजेंद्रकृष्ण कापसे
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या राजकारणाची सुरवात ही हवेली तालुक्यातील अहिरे गावातून झाली आहे. सरपंच ते आमदार हा प्रवास त्यांनी आपल्या स्टाइलने केला होता. आता त्यांची तिसरी पिढी या गावच्या राजकारणात उतरली आहे.

खडकवासला : खडकवासला विधानसभा मतदारसंघातील अहिरे गावात दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कुटुंबाकडे पुन्हा सत्ता आली आहे. त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी यामुळे राजकारणात आली आहे. 

दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे चुलतभाऊ युवराज सरपंचपदी तर युवराज नारायण वांजळे पदी 1365 पैकी 740 मते मिळवून विजयी झाला आहे. याचबरोबर सदस्यपदी ज्ञानेश्वर भिवराम मोकर, साधना समीर शिर्के, राहुल नारायण वांजळे, रोहिणी राहुल वांजळे, अनिता अनिल वांजळे, सतीश नामदेव वांजळे तर दिशा रमेश वांजळे बिनविरोध विजयी झाल्या आहेत. दिशा वांजळे ह्या रमेश वांजळे द्वितीय कन्या आहेत. त्या एमबीएच्या द्वितीय वर्षात शिकत आहेत. राहुल नारायण वांजळे हे रमेश वांजळे चुलतभाऊ आहेत. 

दिवंगत रमेश वांजळे यांचे वडील वस्ताद हिरामण वांजळे हे 1972 ते 1977 व 1977 ते 1982 असे 10 वर्षे सरपंच होते. रमेश वांजळे हे 1987 ते 1992 व 1992 ते 1997 असे 10 वर्षे सरपंच होते. तर त्यांचे लहान भाऊ राजाभाऊ वांजळे 2002 ते 2007 पर्यत उपसरपंच होते. 2002 ते 2007 या कालावधीत ते हवेली पंचायत समितीचे सदस्य व उपसभापती होते.

रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा 2007 ते 2012 त्या जिल्हा परिषद सदस्या होत्या. 2009 ते जून 2011 पर्यंत रमेश वांजळे आमदार होते. तर त्यांचे भाऊ शुक्राचार्य वांजळे 2012 ते 2017 पर्यंत जिल्हा परिषदचे सदस्य होते. ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षही होते. 2017 मध्ये रमेश वांजळे यांची मोठी मुलगी सायली ही पुणे महापालिकेत वारजे माळवाडी प्रभागातून सदस्य झाली. सायली ही पुणे महापालिकेतून व दिशा आहिरेगावातून निवडून आल्याने वांजळे यांची तिसरी पिढी राजकारणात आली आहे. 

संबंधित लेख