agitation at pune university | Sarkarnama

पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात घोड्याला पुणेरी पगडी घालून आंदोलन 

मीनाक्षी गुरव
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 114 व्या पदवीप्रदान सोहळ्यात पुणेरी पगडी वापरण्यास विरोध करीत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोड्याला पुणेरी पगडी घालून विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला.

पुणेरी पगडी वापरण्यास विरोध करीत पदवी प्रदान समारंभात गाढव सोडण्याची धमकी आंदोलनकर्त्यांनी दिली होती. प्रत्यक्षात गाढवाऐवजी घोड्याच्या डोक्‍याला पगडी घालून विद्यापीठ प्रवेशद्वारावर आंदोलन केले. 

दरम्यान, मुख्य समारंभाच्या ठिकाणी कुलगुरूंचे भाषण सुरू असताना कुलगुरूंच्याविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. आकाश झांबरे-पाटील, शर्मिली येवले, कुलदीप आंबेकर यांच्यासह आठजणांचा यात समावेश होता. यामुळे पदवीप्रदान सोहळ्यातील वातावरण काही काळ तापले होते.

विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभातील गाऊन आणि पुणेरी पगडी अशी वेशभूषा ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. मात्र, यंदा त्यातील गाऊन हद्दपार करून पारंपरिक कुर्ता वापरण्याचे जाहीर केले होते. यात पुणेरी पगडी मात्र कायम ठेवली, त्यामुळे काही विद्यार्थी संघटनांनी त्याला विरोध दर्शविला होता. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख