agitation by opposition to cancel transfer of PI | Sarkarnama

टिळेकरांबर गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस आधिकाऱ्यासाठी पुण्यात मोर्चा 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

पुणे : आमदारांवर गुन्हा दाखल करणारे पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची बदली रद्द करा, अशी मागणी करतानाच मी येत्या आठ दिवसांत आमदार योगेश टिळेकरांची अजून अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी दिला आहे. 

आमदार टिळेकरांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गायकवाड यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. याच्या निषेधार्थ मनसेने आज कोंढवा अग्निशामक दलापासून पोलिस ठाण्यापर्यंत मूकमोर्चा काढला. मोर्चात कार्यकर्त्यांबरोरच इतर पक्षातील काही पदाधिकारीही सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना मोरे यांनी आमदार टिळेकरांवर आणखी आरोप केले. सामान्य नागरीकांना त्रास देणारा आमदार असल्याचे त्यांनी सांगितले.  केबल टाकण्यासाठी 50 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आमदार टिळेकर यांच्यावर आहे. त्याआधी येवलेवाडी विकास आराखड्यात बांधकाम व्यावसायिकाच्या सोयीची कामे केल्याबद्दल आणि त्यासाठी चारचाकी मोटारीसह अन्य फायदे लाटल्याचा आरोप मोरे यांनी आमदार टिळेकर यांच्यावर केला होता. 
 
संबंधित लेख