Agitation against Nevase MIDC Land Acquisition | Sarkarnama

आमदार मुरकुटे तुपाशी भूमिपूत्र उपाशी; विस्थापित शेतकर्‍यांचा आरोप

सुनील गर्जे
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

नेवासे : नेवासे तालुक्यातील पांढरीपूल औद्योगिक वसाहतीसाठी जमीनी देणार्‍या विस्थापित शेतकर्‍यांना शासनाने जमिनी आधिग्रहण करतांना दिलेल्या आश्वासनपूर्ती करावी, या मागणीसाठी मंगळवार (ता. 2) रोजी नेवासे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रारंभ झाला आहे. दरम्यान, याप्रश्नी आमदार बाळासाहेब मुरकुटेंवर दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप करून संतप्त आंदोलकांनी "आमदार मुरकुटे नातलगांसह तुपाशी, भूमिपुत्र मात्र उपाशी" असा आरोप करत याच घोषणा दिल्या.

नेवासे : नेवासे तालुक्यातील पांढरीपूल औद्योगिक वसाहतीसाठी जमीनी देणार्‍या विस्थापित शेतकर्‍यांना शासनाने जमिनी आधिग्रहण करतांना दिलेल्या आश्वासनपूर्ती करावी, या मागणीसाठी मंगळवार (ता. 2) रोजी नेवासे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रारंभ झाला आहे. दरम्यान, याप्रश्नी आमदार बाळासाहेब मुरकुटेंवर दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप करून संतप्त आंदोलकांनी "आमदार मुरकुटे नातलगांसह तुपाशी, भूमिपुत्र मात्र उपाशी" असा आरोप करत याच घोषणा दिल्या.

सामाजिक कार्येकर्ते पांडुरंग होंडे, रामभाऊ पुंड, संतोष पुंड यांच्या नेतृत्वाखाली विस्थापित गावांतील  शेतकरी नेवासे तहसील कार्येलयासमोर संपादित जमिनींना एकरी 50 लाख रुपये भरपाई मिळाली पाहिजे, विस्थापित शेतकर्‍यांना वसाहतीतीत व्यावसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या, कुटुंबियातील एका सदस्याला कंपनीती कायम स्वारूपी नोकरीत घ्या यासह आदी मागण्यासाठी उपोषणास बसले आहेत.
    

याबाबत माहिती देताना पांडुरंग होंडे म्हणाले, "औद्योगिक वसाहतीतील सोयी-सुविधा तसेच अडचणींसंदर्भात भेटण्यास गेलेल्या उद्योजकांना स्थानिक शेतकऱ्यांची भीती घालून येथील विविध कारखान्यांची कामे नातेवाईकांना मिळवून दिल्याचा आरोप लोकप्रतिनिधींच्या ठेकेदार नातेवाईकांनी स्थानिक भूमिपुत्रांना डावलून बाहेरच्या लोकांना रोजगार दिल्याने या परिसरात मोठा असंतोष खदखदत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी नातलगांसह तुपाशी, मात्र भूमिपुत्र उपाशी' अशी परिस्थिती ओढवली आहे.

"नेवासे तालुक्यातील पांढरीपूल एमआयडीसीसाठी शिगंवेतुकाई, लोहगांव, वाघवाडी, झापवाडी येथील शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करताना संबंधितांकडून त्यांना वसाहतीत स्वतंत्र राखीव जागा, योग्य मोबदल्यासह येथील कंपन्यांमध्ये विस्थापित शेतकऱ्यांच्या मुलांसह स्थानिकांना रोजगारासाठी प्राधान्यक्रम देण्याचे आश्वासन दिले होते.
'',असेही त्यांनी सांगितले.

आ.मुरकुटेंनी नातेवाईकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या : शिवनाथ होंडे
"ऐन तारुण्यात होती नव्हती तेवढी सुपीक जमीन औद्योगिक वसाहतीसाठी दिली. वाटलं नुकसान भरपाईसह परिसरातील आपल्यासारख्या असंख्य तरुणांचा रोजगाराचा प्रश्न सुटेल. पण तेव्हापासून आमच्या नशिबाला लागलेले हे ग्रहण अजूनही सुटलेले नाही. आमदार मुरकुटेकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्यांनीही त्या पूर्ण केल्या. मात्र, त्यांच्या नातेवाईकांच्या असा आरोप विस्थापित शेतकरी शिवनाथ होंडे यांनी केला.

राजकीय भामटेगीरीचे बळी : बाळासाहेब ससे
आम्ही लोकप्रतिनिधींना आमचा हक्क मिळवून द्या म्हणून साकडे घातले तर त्यांनी आमच्या निवेदनाचा धाक दाखवून उद्योजकांवर दडपण आणून स्वतःच्या नातेवाईकांची दुकानदारी भक्कम केली. आमच्या कुटुंबाची सर्वात जास्त जमीन औदयोगिक वसाहतीसाठी देऊनही आमच्यावर देशोधडीला लागण्याची वेळ केवळ या राजकीय भामटेगिरीमुळे आली असल्याचा आरोप विस्थापित शेतकरी बाळासाहेब ससे यांनी केला.

जमीन संपादन आढावा
जमीन संपादन कालावधी : 1990-97 
विस्थापित शेतकरी : 160 
संपादित जमीन (हेक्टर) : 254

 

संबंधित लेख