agitaion against bhayyu maharaj | Sarkarnama

कोपर्डीत भय्युजी महाराजांचा पुतळा जाळला! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 जुलै 2017

भय्यूजी महाराजांच्या सुर्योदय संस्थेच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या निर्भयाच्या स्मारकाला संभाजी ब्रिगेडसह विविध मराठा संघटनांनी प्रखर विरोध केला. त्यामुळे कोपर्डीत गुरुवारी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान, भैय्युजी महाराजांचा कार्यक्रम रद्द झाल्याने तणाव काहीसा निवळला. 

नगर : भय्यूजी महाराजांच्या सुर्योदय संस्थेच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या निर्भयाच्या स्मारकाला संभाजी ब्रिगेडसह विविध मराठा संघटनांनी प्रखर विरोध केला. त्यामुळे कोपर्डीत गुरुवारी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान, भैय्युजी महाराजांचा कार्यक्रम रद्द झाल्याने तणाव काहीसा निवळला. 

सकाळपासून भैय्युजी महाराजांच्या निषेधाच्या घोषणा देत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी महाराजांचा पुतळा जाळला. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी संभाजी ब्रिगेडचे राजेश परकाळे, शिवानंद भानुसे, टिळक भोस, गोरख दळवी यांच्यासह चार ते पाच जणांना ताब्यात घेतले. 

सकाळी वर्षश्राद्धनिमित्त नियमित धार्मिक कार्यक्रमाबरोबरच समाजप्रबोधनकर वासुदेव महाराज आर्वीकर यांचे कीर्तन झाले. त्यानंतर उपस्थितांच्यावतीने निर्भायावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या स्मृती स्थानासमोर दोन मिनिटे स्तब्धता पाळून सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली. 

संबंधित लेख