agiatators not listen to maratha leaders | Sarkarnama

प्रवीण गायकवाड, राजेंद्र कोंढरे यांचेही अतिउत्साही आंदोलक ऐकेनात! #MaharashtraBandh

उमेश घोंगडे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

पुणे : पुणे शहरातील मराठा आरक्षण आंदोलनाला आज गालबोट लागले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलन समन्वयकांनी  संपल्याचे जाहीर केल्यानंतरही  आंदोलक हटेनात. रात्री उशीरापर्यंत आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बसून होते. समन्वयक प्रवीण गायकवाड, राजेंद्र कोंढरे, विकास पासलकर यांच्यासह विराज तावरे तसेच अन्य कार्यकर्त्यांनी वारंवार सांगूनही आंदोलक कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. 

पुणे : पुणे शहरातील मराठा आरक्षण आंदोलनाला आज गालबोट लागले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलन समन्वयकांनी  संपल्याचे जाहीर केल्यानंतरही  आंदोलक हटेनात. रात्री उशीरापर्यंत आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बसून होते. समन्वयक प्रवीण गायकवाड, राजेंद्र कोंढरे, विकास पासलकर यांच्यासह विराज तावरे तसेच अन्य कार्यकर्त्यांनी वारंवार सांगूनही आंदोलक कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. 

सकाळी अकरा वाजल्यापासून आंदोलक कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमू लागले. दुपारी एक वाजेपर्यंत आंदोलन सुरू होते. त्यानंतर समन्वयाकांनी राष्ट्रगीत घेऊन ठिय्या आंदोलन संपल्याची घोषणा केली. मात्र आंदोलक कार्यकर्ते माघारी हटायचे नाव घेईनात. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुमारे तीन हजार कार्यकर्त्यांचा जमाव होता.

यातील काहींनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न केला. काहींनी भरलेल्या पाण्याच्या बाटल्या, चपला. आत असलेल्या पोलिसांवर भिरकावल्या. झेंड्याला लेवलेल्या काठ्या व सिमेंटच्या ब्लॉकच्या सहाय्याने प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न केला.शेकडो कार्यकर्ते प्रवेशद्वारावरून उड्या मारून आत गेले. हा सारा गोंधळ सुरू झाल्यानंतर समन्वयकांपैकी राजेंद्र कोंढरे, प्रवीण गायकवाड, विकास पासलकर यांच्यासह अनेकांनी आंदोलक कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केले.

कोंढरे यांनी आरक्षणाच्या मागणीची सुरवात व आतापर्यंतची वाटचालीची माहिती दिली. कोंढरे यांचे आधीचे म्हणणे ऐकूण घेतले व त्यांनी आंदोलन थांबवण्याची विनंती केल्यानंतर कार्यकर्ते भडकले. मात्र उपस्थित आंदोलकांपैकी काहींनी या समनव्यकांनाच तुम्ही कोण, अशी विचारणा करीत आंदोलनस्थळ आम्ही सोडणार नाही, या शब्दात उत्तर दिले. 

या अतिउत्साही कार्यकर्त्यांना आताच आरक्षण लागू करा, अशी मागणी केली. असे आरक्षण देणे शक्य नसल्याचे समन्वयक सांगताच त्यांना सरकारधार्जिणे ठरवून हे आंदोलक मोकळे होत होते. हे आंदोलक मराठा संघटनांशी संबंधित नव्हते, असे विविध पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

हे आंदोलक कोणत्या परिसरातून आलेत, ते कोणत्या संघटनेचे आहेत, त्यांना कोणी चिथावले, याचा शोध सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते घेत होते. पोलिसांनी कमालीचा संयम राखत जिल्हाधिकारी कार्यालयातील या उत्साही कार्यकर्त्यांना सहन केले.

गायकवाड, कोंढरे, पासलकर या मंडळींनी मराठा आरक्षणासाठी गेले अनेक वर्षे तयारी केली. अभ्यास, आंदोलने, संघटन याद्वारे या आरक्षणाच्या विषयावर समाजात जागृती केली. त्यांनाच या नवख्या पोरांनी तुम्ही कोण, असा प्रश्न विचारल्याने ते देखील हतबल झाले. पुण्यात हिंसा घडविण्याचा बाहेरच्या मंडळींचा हात असल्याचे त्यानंतर कोंढरे यांना सांगावे लागले. 

संबंधित लेख