वयाच्या ८१ व्या वर्षीही जवानांना सामग्री पुरविण्याची अण्णा हजारेंची तयारी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सध्या उपचारार्थ रुग्णालयात दाखल आहेत. जम्मू काश्मिरच्या पुलवामा येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याने ते व्यथित झाले आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी आता पाकिस्तानशी आरपार होऊ द्या. माझे वय झाल्यामुळे मला आता शस्त्र पेलवणार नाही, पण जवानांना साधान-सामग्री पुरविण्याची माझी अजूनही तयारी आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
वयाच्या ८१ व्या वर्षीही जवानांना सामग्री पुरविण्याची अण्णा हजारेंची तयारी

नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सध्या उपचारार्थ रुग्णालयात दाखल आहेत. जम्मू काश्मिरच्या पुलवामा येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याने ते व्यथित झाले आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी आता पाकिस्तानशी आरपार होऊ द्या. माझे वय झाल्यामुळे मला आता शस्त्र पेलवणार नाही, पण जवानांना साधान-सामग्री पुरविण्याची माझी अजूनही तयारी आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हजारे सध्या नगरच्या नोबल हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. सात दिवस उपोषण केल्याने त्यांचे वजन कमी होऊन अशक्तपणा आला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या सर्व तपासण्या झाल्या असून, काळजीचे कारण नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले आहे.

जम्मू काश्मिरच्या पुलवामा येथील हल्ल्याबाबत त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांना पूर्वीचे दिवस आठवले. हजारे पूर्वी लष्करात होते. जवानांना साधन-सामुग्री पुरविण्याच्या वाहनावर ते चालक होते. देशसेवा करताना आंतर्गत विविध विषयांनी देश पोखरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी त्यांनी ही नोकरी सोडून समाजसेवेचे वृत घेतले. देशसेवेची त्यांची आवड वाढतच गेली. त्यांच्या प्रत्येक भाषणाच्या वेळी 'जय हिंद;\' चा नारा त्यांनी दिला. कालची घटना घडल्यानंतर ते व्यथित झाले.

हल्ल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, की पाकिस्तानला आता धडा शिकविण्याची गरज आहे. एकदा होऊन जावू द्या. किती दिवस हे सहन करणार. यावर सरकारने विचार करावा. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत हीच भावना आहे. केंद्राने देशातील नागरिकांच्या भावनांचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com