after 2019 i will continue cm devendra fadanvice | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

2019 नंतरही मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातच राहणार : देवेंद्र फडणवीस 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

मुंबई : 2019 नंतर मुख्यमंत्री म्हणून मीच महाराष्ट्रात राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

भाजप-शिवसेना युती सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर फडणवीस यांनी काही वृत्त वाहिन्यांना मुलाखती दिल्या. सरकारच्या कामगिरीचा त्यांनी आपल्या खास शैलीत माहिती देताना झालेली कामे आणि प्रगती पथावरील कामाची त्यांनी माहीती दिली.

 2019 मध्ये लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकानंतर आपण दिल्लीत जाणार का ? दिल्लीत जायला आवडेल का ? असे विचारता फडणवीस म्हणाले,की 2019 नंतरही मीच मुख्यमंत्री असेन. मी महाराष्ट्रातच राहणार त्यामुळे दिल्लीत जाण्याचा प्रश्‍नच नाही असे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले. 
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राज्यात राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने त्यांचे विरोधक कोणत्या प्रतिक्रिया देतात याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.  
 
संबंधित लेख