afganistan | Sarkarnama

अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा राजीनामा

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

काबूल : अफगाणिस्तानच्या लष्करी तळावर गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे टीकेचे धनी बनलेले देशाचे संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुख यांनी आज राजीनामा दिला. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी या दोघांचे राजीनामे स्वीकारले आहेत. 

शरीफ येथील लष्करी तळावर दहा दहशतवाद्यांनी लष्करी गणवेशात आणि लष्करी वाहनामध्ये येत हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी अधिकाऱ्यांचे भोजनालय आणि आवारातील मशिदीला लक्ष्य केले होते. या हल्ल्यातील बळींची संख्या अद्यापही जाहीर करण्यात आली नसली तरी, शंभरहून अधिक अधिकारी आणि नागरिकांचा यात मृत्यू झाल्याचे समजते. किमान 50 जण या हल्ल्यात ठार झाल्याचा अमेरिकेचा दावा आहे. या हल्ल्यानंतर संरक्षणमंत्री अब्दुल्ला हबीबी आणि लष्करप्रमुख कदाम शाह शहिम यांच्यावर जोरदार टीका होत होती. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरत होती. या पार्श्‍वभूमीवर या दोघांनीही आज पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला. 

संबंधित लेख